Royalchef.info च्या वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. येणारी दिवाळी सर्वाना आनंदाची, आरोग्यदायक, सुख समृधीची जावो अशी देवाच्या चरणी प्रार्थना आहे.
Royalchef ही एक पदार्थ बनवण्याची लोकप्रिय वेबसाईट आहे. ह्या वेबसाईट मध्ये २००० पदार्थाच्या रेसिपी आहेत. महाराष्ट्रात दिवाळीसाठी विविध फराळाचे पदार्थ बनवले जातात. Royalchef ह्या वेबसाईट मध्ये देवाळी फराळाचे नानाविध पदार्थ अगदी सोप्या शब्दात लिहिले आहे. तसेच प्रत्येक पदार्थाचा फोटो सुद्धा आहे. दिवाळी साठी विविध प्रकारच्या करंज्या, लाडू, चिवडा, शेव, चकली, शंकरपाळी अश्या प्रकारचे विविध पदार्थ आहेत. काही उपयुक्त माहिती सुद्धा आहे.
दिवाळी व तसेच इतर सणावारा बद्दल मुद्देसूद माहिती सुद्धा दिली आहे. ह्या वर्षी दीपावली १७ ऑक्टोबर, २०१७ ते २१ ऑक्टोबर,२०१७ ह्या काळात आहे.
धनत्रयोदशी – १७ ऑक्टोबर
१७ ऑक्टोबर,२०१७ ह्या रोजी मंगळवार असून धनत्रयोदशी असून शुभ काळ हा सकाळी ९:२२ मिनिट पासून दुपारी १:४४ परंत आहे. तसेच संध्याकाळी ७:३८ मिनिट पासून रात्री ९;२१ मिनिट पर्यंत आहे. धनत्रयोदशी ह्या दिवशी धनलक्ष्मीची पूजा करतात. पूजा नेहमी प्रमाणे करतात. प्रसादासाठी धने व गुळ ठेवतात. पाच दिवे लावतात व त्याची पूजा करतात. मग आपल्या घराच्या दारा समोर रांगोळी घालून पाहिला दिवा लावतात. धनलक्ष्मी आपल्याला अन्न धान्य कधी कमी पडू देत नाही व घरामध्ये सुख शांती आणते.
नर्कचतुर्दशी – १८ ऑक्टोबर
१८ ऑक्टोबर नर्कचतुर्दशी ह्या दिवशी शुभ काळ सकाळी ६:२८ मिनिट ते ७:५५ परंत आहे. ह्या दिवशी सकाळी उटणे लाऊन अभ्यंगस्नान करतात.
लक्ष्मी पूजन – १९ ऑक्टोबर
१९ ऑक्टोबर गुरुवार आहे ह्या दिवशी लक्ष्मी पूजन आहे. लक्ष्मी पूजनासाठी संध्याकाळी ४:३७ मिनिट ते ९: ३६ मिनिट परंत आहे. ह्या दिवशी अमावस्या आहे. संध्याकाळी लक्ष्मी पूजन करावे.
बली प्रतिपदा पाडवा – २० ऑक्टोबर
२० ऑक्टोबर शुक्रवार ह्या दिवशी दीपावली पाडवा आहे. कार्तिक शुद्ध प्रतिपदा असून ह्या वर्षी नवीन बर्ष चालू होते. ह्या दिवशीचा मुहूर्त साडेतीन मुहूर्त पैकी मानला जातो. ह्या दिवशी नवीन घराची वस्तू शांती, नवीन वाहन खरेदी केली जाते.
भाऊबीज – २१ ऑक्टोबर
२१ ऑक्टोबर शनिवार ह्या दिवशी भाऊबीज आहे.