“घराला घरपण देणारी माणस” हे ब्रीदवाक्य असणारे श्री दीपक सखाराम कुलकर्णी सध्या घराला घर घर दिणारी माणस असे का झाले. गेल्या ३५ वर्षा पासून श्री डी एस कुलकर्णी हे बांधकाम ह्या व्यवसायात लोकप्रिय आहेत. पण मागील एक वर्षापासून मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
श्री डी. एस. कुलकर्णी यांनी आपल्या बांधकाम व्यवसाय साठी मध्यम वर्गीय व पेंशनर यांच्या कडून करोडो रुपये ठेवी म्हणून घेतले. एक वर्षा पासून ते ठेवीदारांना वेळेवर व्याज देऊ शकत नसल्यामुळे ठेवीदारांचे आर्थिक दृष्ट्या प्रश्न निर्माण झाले आहेत. ठेवीदार हे पुणे, मुंबई, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर येथील असून जवळपास ८००० ठेवीदार आहेत.
आपले ठेवीचे पैसे व व्याजाचे पैसे मिळण्यासाठी ठेवीदारांनी डी एस के ह्याच्या ऑफिसमध्ये बऱ्याच चकरा मारल्या तरी त्यांना त्याचे व्याजाचे किंवा ठेवीचे पैसे मिळाले नाही.
आपले पैसे मिळावेत म्हणून २८ ऑक्टोबर २०१७ शनिवार रोजी आर्थिक गुन्हे अन्वेषण, पुणे ह्या ठिकाणी रीतसर FIR नोंदवली आहे.
त्यानंतर तक्रार करण्याऱ्या FD Holders ची पोलीस साक्षीदार म्हणून नोंद करत आहेत.
त्यानंतर १ नोव्हेंबर २०१७ बुधवार रोजी २५९ ठेवीदारांनी तक्रार नोंदवली आहे. आतापर्यंत जवळपास ३६० पेक्षा जास्त ठेवीदारांनी तक्रार नोंदवली आहे. तसेच आर्थिक गुन्हे अन्वेषण, पुणे ह्या विभागानी त्याची गंभीर दखल घेतली असून त्यानुसार वेगानी पावले सुद्धा उचलली आहेत.
अजून ज्या ठेवीदारांना तक्रार नोंदवायची आहे, त्यानी खाली दिलेल्या FORM मध्ये माहिती भरून सोबत कागदपत्रे जोडावीत. जेणे करून आपल्याला आपले पैसे लवकरात लवकर मिळतील.
Fixed Deposit माहिती बाबत वरील दोन फॉर्म हे आपल्याला आर्थिक गुन्हे अन्वेषण कार्यालयात मिळेल.
१) Fixed Deposit ची माहिती भरून ठेवीदारांनी स्वाक्षरी करावी.
२) ठेवीदाराची व ठेवीची माहिती भरावी त्यामध्ये ठेवीदाराचे नाव, डी. एस के ह्याच्या कंपनीचे नाव, कंपनीचे भागीदार, ठेवीची मुदत, ठेवीची रक्कम, व्याजदर, एकून रक्कम बाकी (त्यामध्ये ठेवीची रक्कम व व्याजाची रक्कम ३१-१०-२०१७ पर्यंत लिहावी.)
३) चेकची फोटो कॉपी काढून त्यावर ठेवीदाराची स्वाक्षरी घ्यावी.
४) ठेवीची पावती जी आपल्याला ठेव ठेवतांना मिळाली आहे. त्याची फोटो कॉपी करून ठेवीदारांनी त्यावर स्वाक्षरी करून आर्थिक गुन्हे अन्वेषण, संगम ब्रिज, RTO जवळ, पुणे येथे जमा करावे.
५] Fixed Deposit माहिती फॉर्म भरून जमा केल्यावर आपल्याला नोंदणी क्रमांक मिळेल.
टीप – Original चेक व ठेवीची पावती दाखल करू नये कारण त्या आपल्याला नंतर कोर्टात दाखल कराव्या लागतील.
Self Attested Xerox प्रती दाखल कराव्यात.
तक्रार देण्याची वेळ – साधारण सकाळी ११ ते ५
Address:
Sr Inspector Sanjay Kurundkar
Economics Offence Wing Crime Branch Pune
CID Office
Maharashtra State Headquarters,
Shivaji Nagar,
Near Sangam Bridge,
Shivajinagar, Pune,
Maharashtra 411005
Tel No- 020-25540077
020-26208377