टोमाटो ब्रुशेटा: ब्रुशेटा ही एक ईटालियन डीश स्टार्टर म्हणून लोकप्रिय आहे. ब्रुशेटा बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे. ब्रुशेटा बनवण्यासाठी गार्लिक ब्रेड वापरला आहे त्यामुळे अगदी चवीस्ट लागते. मुलांना ही डीश खूप आवडेल. दुपारी चहा बरोबर बनवायला पण छान आहे.
बनवण्यसाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी:
२ फ्रेंच बॅगेट
२ टे स्पून व्हर्जिन ऑलीव्ह ऑईल
१०-१२ लसून पाकळ्या
२ टे स्पून बटर
मीठ चवीने
टॉपिंग साठी:
२०-२५ लाल व पिवळे चेरी टोमाटो,
१ टे स्पून ओरीगेनो
१ टी स्पून लिंबूरस
मीठ व मिरे पावडर चवीने
कृती: फ्रेंच बॅगेट म्हणजे लांबट आकाराचे ब्रेड. ह्या ब्रेडच्या तिरक्या चकत्या कापून घ्या. लसूण सोलून किसून घ्या.
गार्लिक सॉस बनवण्यासाठी:
लसूण सोलून किसून घ्या. बृशेटा बनवण्यासाठी गार्लिक ब्रेड वापरला तरी चालतो. नसेल तर आपण घरी गार्लिक ब्रेड बनवु शकतो. गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी एका छोट्या भांड्यात बटर व ऑलीव्ह ऑईल १० सेकंद गरम करून घेऊन त्यामध्ये किसलेले लसूण, चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या.
गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी:
ब्रेडच्या चकत्या घेऊन जर मायक्रोवेव्ह असेल तर प्रीहिट करून १० मिनिट ग्रील करून घ्या. जर मायक्रोवेव्ह नसेल तर नॉन स्टिक तव्यावर मंद विस्तवावर ग्रील करून घ्या. ब्रेड ग्रील करून झाल्यावर १/४ टी स्पून गार्लिक सॉस एकेका चकतीवर दोनी बाजूनी लावा. परत ब्रेड थोडा ग्रील करून घ्या म्हणजे ब्रेड छान कुरकुरीत होईल.
टॉपिंग साठी:
लाल पिवळे चेरी टोमाटोचे चिरून दोन भाग करून घ्या. एका बाऊलमध्ये चीरेलेले चेरी टोमाटो, लिंबूरस घालून हलक्या हातानी मिक्स करून घ्या.
टोमाटो ब्रुशेटा बनवण्यासाठी:
ग्रील केलेले ब्रेड घेऊन त्यावर १ १/२ टे स्पून टोमाटो टॉपिंग पसरवून त्यावर ओरीगेनो, मीठ व मिरे पावडर भुरभुरून मग सर्व्ह करा.