इटालीयन गार्लिक चिकन: इटालीयन गार्लिक चिकन ही डीश पारंपारिक डीश आहे. ही डीश बनवतांना गार्लिक सॉस बनवून ब्रेड क्रम्ब्समध्ये चिकनचे तुकडे घोळून बेक केले आहे त्यामुळे ह्याची चव खूप छान लागते. इटालीयन गार्लिक चिकन बनवायला सोपे व झटपट होणारे आहे. तसेच ह्यामध्ये मसाला नाही त्यामुळे लहान मुलांना नक्की आवडेल. बेक केले आहे त्यामुळे तेल सुद्धा वापरले नाही.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
८ बोनलेस चिकन तुकडे
१/२ कप बटर
२ टे स्पून लसूण (किसून)
३ ब्रेड स्लाईस (क्रम्ब्स)
१ कप फ्रेश चीज (किसून)
१/४ टी स्पून ओवा
१/४ टी स्पून ऑरगॅनो
१/४ टी स्पून मिरे पावडर
मीठ चवीने
कृती:
चिकनचे तुकडे स्वच्छ धुऊन बाजूला ठेवा. लसूण सोलून किसून घ्या. ब्रेड स्लाईस मिक्सरमध्ये थोडेसे ग्राईड करून घ्या. चीज किसून घ्या.
एक छोट्या कढईमधे बटर थोडेसे गरम करून त्यामध्ये किसलेला लसूण घालून २ मिनिट शिजवून घ्या.
एका बाऊलमध्ये ब्रेड क्रम्ब्स, चीज, ओवा, ऑरगॅनो,मिरे पावडर, मीठ मिक्स करून घ्या.
चिकनचा एक तुकडा घेऊन प्रथम गार्लिक बटर सॉस मध्ये गोळून मग ब्रेडच्या मिश्राणामध्ये चांगला घोळून घ्या. अश्या प्रकारे सर्व चिकनचे तुकडे घोळून बाजूला ठेवा. एका ओव्हन प्रुफ डीश/प्लेट मध्ये सगळे चिकनचे तुकडे ठेवा.
ओव्हन गरम करून घेऊन त्यामध्ये डीश ओव्हनमध्ये ठेवून ३० मिनिट बेक करून घ्या.
गरम गरम इटालीयन गार्लिक चिकन ब्रेड बरोबर सर्व्ह करा.