चॉकलेट स्ट्रॉबेरी: चॉकलेट स्ट्रॉबेरी हे इटालीयन डेझर्ट आहे. आता स्ट्रॉबेरीचा सीझन आहे तर हे डेझर्ट करून बघा. स्ट्रॉबेरी ताज्या घेऊन त्याला चॉकलेटमध्ये डीप करून त्याला सजवायचे. चॉकलेट स्ट्रॉबेरी हे बनवायला सोपे व झटपट होणारे आहे, तसेच चवीस्ट व दिसायला आकर्षक सुद्धा आहे. लहान मुलांच्या पार्टीला बनवायला छान आहे.
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: १२ बनतात
साहित्य:
१२ मोठ्या आकाराच्या स्ट्रॉबेरी (ताज्या)
१/४ कप डार्क चॉकलेट बेस
१/४ कप व्हाईट चॉकलेट बेस
सजावटीसाठी बडीशेप गोळ्या,
डेसीकेट कोकनट, ड्राय फ्रुट
कृती:
ताज्या स्ट्रॉबेरी स्वच्छ कापडानी हळुवारपणे पुसून घेऊन बाजूला ठेवा.
एका बाऊलमध्ये डार्क चॉकलेट व दुसऱ्या बाऊलमध्ये व्हाईट चॉकलेट डबल बॉईल सिस्टीमने वितळवून घेऊन बाजूला थोडे थंड करायला ठेवा.
एक स्ट्रॉबेरी घेऊन डार्क चॉकलेटमध्ये अर्धवट बुडवून घ्या. एक मिनिट तसेच बाउल वरती ठेवा. मग जास्तीचे चॉकलेट निघून जाईन. चॉकलेट घट्ट झाले की त्याला बडीशेपच्या गोळ्या, डेसिकेटेड कोकनट, ड्राय फ्रुट ने सजवून ५ मिनिट डीपफ्रीजमध्ये ठेवा म्हणजे छान घट्ट होईल.
चॉकलेट स्ट्रॉबेरी सजावट करतांना विरुद्ध पदार्थ घेऊन सजावट करा. म्हणजे डार्क चॉकलेट घेतले तर त्यावर डेसिकेट कोकनट लावून सजवा किंवा बडीशेपच्या गोळ्या लावा. तसेच व्हाईट चॉकलेट घेतलेतर ड्रायफ्रुटने सजवा किंवा चॉकलेटच्या बारीक तुकड्यानी सजवा.