व्हेज रीसोटो: व्हेजीटेबल रीसोटो ही इटालीयन मेन कोर्स जेवणातील डीश आहे. रीजोटो म्हणजे भात होय. ही डीश बनवतांना व्हेजीटेबल स्टॉकमध्ये भात शिजवून घेऊन परत ह्यामध्ये विविध भाज्या पण आहेत त्यामुळे अश्या प्रकारचा भात पौस्टिक आहेच. मुलांना अश्या प्रकारचा राईस खूप आवडेल.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२ कप तांदूळ
५ कप व्हेजीटेबल स्टॉक
१ टे स्पून ऑलीव्ह ऑईल
२ कप भाज्या (चिरून) (मश्रूम, मटार, गाजर, बीन्स, स्वीट कॉर्न, शिमला मिर्च, टोमाटो)
मीठ चवीने
कृती: एका जाड बुडाच्या भांड्यात तेल थोडे गरम करून चिरलेल्या भाज्या घालून थोड्या परतून घेऊन त्यामध्ये तांदूळ घालून थोडे परतून घेऊन व्हेजीटेबल स्टॉक घालून मंद विस्तवावर २०-२५ मिनिट भात शिजवून घ्या. मधून मधून भात हलवून घ्या म्हणजे खाली लागणार नाही.
भात शिजला की थोडा कोरडा होईल तेव्हा सर्व्ह करा.
टीप: व्हेजीटेबल स्टॉक बनवतांना दालचीनिचा तुकडा ४-५ मिरे घालावे छान चव व तसेच सुगंध पण येतो.