लेमन-पेपर ग्रीन बीन्स सलाड: लेमन-पेपर ग्रीन बीन्स सलाड हे एक इटालीयन स्टाईल सलाड आहे. ग्रीन बीन्स सलाड हे थंड सर्व्ह करता येते व तसेच हे दही बरोबर सर्व्ह करतात. हे सलाड बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे. ह्या सालाडला बीन्स समर सलाड सुद्धा म्हणतात.
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१०० ग्राम फ्रेश बीन्स
२ लिंबू (लिंबाची साले किसून)
१ टे स्पून ओलिव्ह ऑईल
मीठ चवीने
मिरे पावडर चवीने
डीप बनवण्यासाठी:
२ कप दही
मीठ व साखर चवीने
४-५ पुदिना पाने (चिरून)
कृती: बीन्स धुऊन मोठे तिरके तुकडे कापून घ्या. लिंबू किसून त्याची साले बाजूला ठेवा.
डीप बनवण्यासाठी दह्यामध्ये मीठ, साखर चवीने घालून, पुदिना पाने चिरून घालून एक सारखे करून घ्या.
एका भांड्यात २-३ कप पाणी घेऊन त्यामध्ये १ टी स्पून मीठ घालून चिरलेले बीन्स घालून ३-४ मिनिट मोठ्या विस्तवावर बॉईल करून घ्या. मग विस्तव बंद करून बीन्स चाळणीवर ओतून जास्तीचे पाणी काढून घेऊन त्यावर थंड पाणी ओतून चाळणी बाजूला ठेवा.
एका काचेच्या बाऊलमध्ये बीन्स, लिंबाची साले, ओलिव्ह ऑईल, मीठ, मिरे पावडर घालून मिक्स करून घ्या. आपले लेमन-पेपर ग्रीन बीन्स सलाड तयार झाले.
लेमन-पेपर ग्रीन बीन्स सलाड दह्याच्या डीप बरोबर सर्व्ह करा.