पास्ता विथ मश्रूम इन क्रीमी टोमाटो सॉस : पास्ता विथ मश्रूम इन क्रीमी टोमाटो सॉस ही एक इटालीयन डीश आहे पण त्याला महाराष्ट्रियन पद्धतीने बनवले आहे. पास्ता ही डीश सगळ्यांना आवडते. पास्ता आपण नाश्ता साठी किंवा जेवणाच्या वेळेला सुद्धा बनवू शकतो. मश्रूममुळे ह्याला एक छान वेगळीच चव येते. टोमाटोमुळे त्याला रीचनेस येतो. चीज घातल्याने त्याची चव अजूनच बदलते.
बनवण्यासाठी वेळ: ४० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
३५० ग्राम पास्ता
२५० ग्राम मश्रूम,
१ कप घट्ट क्रीम
१/२ कप टोमाटो
३ टे स्पून बटर
१ टे स्पून लसूण (बारीक चिरून)
२ टे स्पून लिंबू रस
मीठ व मिरे पावडर चवीने
२ चीज कूब
कृती :
पास्ता शिजवून घेवून जास्तीचे पाणी काढून घ्या. मश्रूमचे पातळ स्लाईस कापून घ्या. क्रीम चांगले फेटून घ्या. टोमाटो चिरून घ्या. चीज किसून घ्या.
एका खोलगट कढई मध्ये बटर गरम करून त्यामध्ये चिरलेले मश्रूम व लसून घालून २-३ मिनिट फ्राय करून घ्या. मग त्यामध्ये क्रीम घालून २-३ मिनिट शिजवून घेवून त्यामध्ये चिरलेले टोमाटो, लिंबू रस, मीठ, मिरे पावडर घालून मिक्स करून मग त्यामध्ये शिजवलेला पास्ता घालून मिक्स करा शेवटी किसलेले चीज घालून मिक्स करून घ्या.
गरम गरम सर्व्ह करा.
टीप : पास्ता शिजवताना पाणी जास्त घालून मग शिजवल्यावर जास्तीचे पाणी काढून मग त्यावर थंड पाणी घाला म्हणजे पास्ता चिकट होणार नाही.
मश्रूम ताजे वापरा म्हणजे त्याची चव चांगली लागते.