नवरतन कोर्मा: नवरतन कोर्मा ही एक जेवणातील चवीस्ट व रिच भाजी आहे. आपण सणावाराला किंवा घरी पार्टीला सुद्धा बनवु शकतो. नवरतन कोर्मा ह्या भाजी मध्ये भाज्या, पनीर व फळे सुद्धा आहेत.
बनवण्यासाठी वेळ: ४० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१०० ग्राम पनीर
१ छोटा बटाटा, ७-८ बीन्स
५ कॉलीफ्लावर तुरे
१/४ कप हिरवा ताजा मटार
१ छोटे गाजर
१ छोटी शिमला मिरची
१ छोटे सफरचंद
६-७ अननस तुकडे
४-५ चेरी
२ टे स्पून फ्रेश क्रीम
१/४ कप दही
२ मोठे टोमाटो (प्युरी),
मीठ व साखर चवीने
१ टे स्पून बटर
मसाला करीता:
२ मोठे कांदे
८ लसूण पाकळ्या
१” आले तुकडा
३ हिरव्या मिरच्या
१ टी स्पून लाल काश्मिरी मिरची पावडर
१/२ टी स्पून गरम मसाला
कृती:
पनीरचे तुकडे कापून घ्या. बटाटा सोलून त्याचे चौकोनी तुकडे कापून घ्या. कॉलीफ्लावरचे तुरे कापून घ्या. गाज्रचे तुकडे कापून घ्या, शिमला मिरची चिरून घ्या. टोमाटो उकडून प्युरी करून घ्या, कांदा उकडून घ्या. आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट करून घ्या. सर्व भाज्या अर्धवट वाफवून घ्या. फळे चिरून घ्या.
मसाला बनवण्यासाठी: कांदा उकडून मिक्सरमध्ये वाटून घ्या. एका कढईमधे बटर गरम करून त्यामध्ये वाटलेला कांदा थोडा परतून घेऊन आले-लसूण पेस्ट घालून परत एक मिनिट परतून घ्या.
नवरतन कोर्मा: मसाला परतून झाल्यावर त्यामध्ये दही घालून २-३ मिनिट परतून घेऊन टोमाटो प्युरी घालून परतून घेऊन लाल मिरची पावडर, गरम मसाला, मीठ घालून भाज्या घाला व मिक्स करून एक कप पाणी घालून चांगली वाफ आणा. भाज्यांना चांगली वाफ आल्यावर फ्रेश क्रीम, साखर, फळे, चिरी घालून मिक्स करून एक मिनिट वाफ येऊ द्या.
गरम गरम नवरतन कुर्मा परोठा किंवा पुरी बरोबर सर्व्ह करा.