चॉकलेट कोकनट लाडू: चॉकलेट म्हंटले की मुले अगदी खुश होतात. चॉकलेट कोकनट लाडू हे मुले आनंदाने खातील करून बघा. चॉकलेटनी आपल्याला एनर्जी मिळते. अश्या प्रकारचे लाडू आपण वर्षभर म्हणजे कोणत्या पण सीझनमध्ये बनवू शकतो. तसेच बनवायला सोपे आहेत.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: २०-२२ लाडू बनतात
साहित्य:
२०० ग्राम कनडेस्न मिल्क
५० ग्राम डार्क चॉकलेट बेस
१ कप डेसिकेटेड कोकनट

कृती:
डार्क चॉकलेट बेस घेऊन डबल बॉईल सिस्टीमनी चॉकलेट विरघळवून घ्या.
एका नॉन स्टिक भांड्यात कनडेस्न मिल्क घेऊन मंद विस्तवावर २ मिनिट गरम करायला ठेवा. मग त्यामध्ये डेसिकेटेड कोकनट मिक्स करून दोन मिनिट मंद विस्तवावर ठेवा. मिश्रण लगेच घट्ट व्हायला लागलेकी विस्तव बंद करून भांडे बाजूला ५ मिनिट थंड करायला ठेवा. मिश्रणाचे मध्यम आकाराचे लाडू बनवा.
डार्क चॉकलेट घेऊन त्यामध्ये एक-एक लाडू बुडवून मग बाजूला बटर पेपरवर ठेवा. अश्या प्रकारे सर्व लाडू बनवून घेऊन फ्रीजमध्ये ५-७ मिनिट सेट करयला ठेवा.
आपण ह्यामध्ये अजून एक प्रकार बनवु शकतो. डार्क चॉकलेट मध्ये डेसिकेटेड कोकनट मिक्स करून घेऊन त्याचे लाडू बनवून घ्या. मग कनडेस्न मिल्क व डेसिकेटेड कोकनट मिक्स करून घेऊन त्याचे लाडू वळताना त्यामध्ये चॉकलेट लाडू घालून परत लाडू वळून घ्या. हे लाडू सुद्धा चवीला अप्रतीम लागतात. (फक्त हे लाडू बनवतांना डार्क चॉकलेट बेस जास्त घ्या.