Harabhara Mushroom Masala Recipe in Marathi

हराभरा मश्रूम: हराभरा मश्रूम ही भाजी धाभा अथवा हॉटेलमध्ये बनवतात तशी बनते. मश्रूममध्ये प्रोटीन हे बऱ्याच प्रमाणात असतात ही भाजी हिरव्या मसाल्यात बनवली आहे त्यामुळे त्याला हराभरा मश्रूम हे नाव दिले आहे. बनवायला सोपी व झटपट होणारी आहे. मुले अश्या प्रकारची मश्रूमची भाजी आवडीने खातात त्यामुळे अशा प्रकारची भाजी नक्की बनवावी.

The English Language version of the same recipe can be seen here – Green Mushroom Masala

बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी

साहित्य:
१०० ग्राम मश्रूम
१ मोठा कांदा (चिरून)
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून हळद
१ टी स्पून गरम मसाला
मीठ चवीने

मसाला करीता:
१ कप कोथंबीर
८-१० लसूण पाकळ्या
१” आले तुकडा
२ हिरव्या मिरच्या
१ टी स्पून बडीशेप
१/२ टी स्पून शहाजिरे

फोडणी करीता:
१/२ टे स्पून तेल
१/४ टी हिंग

कृती:
मश्रूम स्वच्छ धुऊन घेऊन त्याच्या चकत्या कापून घ्या.. मसाला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
कढईमधे तेल गरम करून हिंग, कांदा घालून गुलाबी रंगावर भाजून त्यामध्ये वाटलेला हिरवा मसाला तेल सुटे परंत भाजून घ्या. मग हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, मीठ, चिरलेले मश्रूम घालून १/२ कप पाणी घालून, झाकण ठेवून ५ मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्या. मग कोकम घालून थोडेसे परतून घ्या.
गरम गरम हरभरा मश्रूम मसाला भाता बरोबर सर्व्ह करा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.