इटालीयन मश्रूम रीसोटो: इटालीयन मश्रूम रीसोटो हा एक जेवणातील भाताचा प्रकार आहे. मश्रूम रीसोटो बनवतांना अर्बोरीयो तांदूळ वापरला आहे. तसेच व्हेजीटेबल स्टॉक मध्ये हा भात शिजवून घेतला आहे त्यामुळे तो चवीस्ट लागतो. चीजचा वापर केला आहे म्हणून ह्याची चव वेगळीच लागते. मुलांना अश्या प्रकारचा भात नक्की आवडेल.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ टे स्पून ऑलीव्ह ऑईल
२ टे स्पून बटर
१ मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
२०० ग्राम मश्रूम
१ कप अर्बोरीयो तांदूळ (हा इटालीयन तांदूळ आहे जर नाही मिळाला तर बुटका जाड तांदूळ वापरावा)
४ कप व्हेजीटेबल स्टॉक
१/३ कप चीज (किसून)
१ टे स्पून पल्स्रली
१/४ कप बटर सर्व्ह करतांना
मीठ चवीने
मिरे पावडर चवीने
कृती:
कांदा चीरुन घ्या. मश्रूम साफ करून उभे किंवा तुकडे चिरून घ्या. चीज किसून घ्या.
एका जाड बुडाच्या भांड्यात बटर व ऑलीव्ह ऑईल गरम करून कांदा व मश्रूम थोडे परतून घ्या. मग त्यामध्ये अर्धा व्हेजीटेबल स्टॉक घालून उकळी आणा व तांदूळ घालून थोडा शिजवून घ्या. मग परत थोडा व्हेजीटेबल स्टॉक घालून मिक्स करून तांदूळ थोडा अजून शिजला की परत राहिलेला व्हेजीटेबल स्टॉक घाला. अश्या प्रकारे तांदूळ चांगला शिजवून घ्या. मग त्यामध्ये चवीने मीठ, मिरे पावडर, पल्स्रली, चीज व बटर घालून मिक्स करून एक वाफ आल्यावर इटालीयन मश्रूम रीसोटो सर्व्ह करा.