खजूर-मावा लाडू: खजूर मावा लाडू हे पौस्टिक लाडू आहेत. नाश्त्याला दुधाबरोबर किंवा चहा बरोबर द्यायला छान आहेत. खजूर-मावा लाडू बनवतांना खवा, खसखस, चारोळी, डेसिकेटेड कोकनट, बदाम वापरले आहेत.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: २५-३० लाडू बनतात
साहित्य:
२५० ग्राम खजूर
१०० ग्राम खवा
२ टी स्पून खसखस
२ टे स्पून चारोळी
१ कप खोवलेला नारळ किंवा डेसिकेटेड नारळ
१/२ कप दुध
१/२ कप पिठी साखर
१/४ कप बदाम
१ टी स्पून वेलचीपूड
कृती:
प्रथम खजुरा मधील बी काढून खजूर व दुध मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. खसखस थोडीशी भाजून जाडसर कुटून घ्या. चारोळी थोडीशी कुटून घ्या. बदाम जाडसर कुटून घ्या.
एका जाड बुडाच्या कढईमधे खवा मंद विस्तवावर गुलाबी रंगावर भाजून घेऊन त्यामध्ये खजूर व साखर घालून घट्ट होई परंत मिश्रण मंद आटवून घ्या. मिश्रण घट्ट झालेकी विस्तव बंद करून मिश्रण थंड करायला ठेवा.
मिश्रण थंड झालेकी त्यामध्ये खसखस, चारोळी, वेलचीपूड व बदाम घालून चांगले मळून घेऊन त्याचे लाडू वळून घ्या.