फुटाणा डाळीचे लाडू: फुटणा डाळ हे पौस्टिक आहे. त्याचे लाडू चवीस्ट लागतात तसेच लाडू बनवतांना गुळ वापरला आहे. गुळ हा आपल्या आरोग्या साठी हितावह आहे. फुटाणा डाळीचे लाडू बनवतांना ह्यामध्ये आपण भाजलेले शेगदाण्याचे तुकडे, खोबरे घालून सुद्धा बनवता येतात.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: २२-२५ लाडू
साहित्य:
२ कप फुटणा डाळ
१ ३/४ कप गुळ
१ टी स्पून वेलचीपूड
१ टी स्पून तूप
कृती:
एका जाड बुडाच्या कढईमधे गुळ व एक टे स्पून पाणी घालून पाक करायला ठेवा. गुळाचा पाक हा घट्ट झाला पाहिजे. मग त्यामध्ये तूप व फुटणा डाळ घालून मिक्स करून ५ मिनिट बाजूला थंड करायला ठेवा. थोडे गरम असतांना छोटे लाडू बनवून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.