खमंग जवसाची चटणी: जवसाची चटणी ही आपल्या आरोग्या करीता फायदेशीर आहे. जवस हे प्रतेक प्रांतात वेगवेगळ्या नावानी ओळखले जाते. महाराष्ट्रात ह्या तेल बीला जवस असेच म्हणतात. जवसामध्ये ओमेगा थ्री हे भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे त्याच्या सेवनाने आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते. जे रोजच्या आपल्या जेवणात १ टे स्पून जवस घेतले तर ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीरच होईल.
जवस हे पचनास थोडे जड असते त्यामुळे त्याची चटणी बनवतांना ते मंद विस्तवावर भाजून घ्यावे व मगच चटणी बनवावी. जवसाच्या सेवनाने मलावरोधाचा त्रास कमी होतो त्यामुळे रोज जेवणात नक्की खावे. जर आपल्या रक्तातील कोलेस्टेरॉल वाढला असेल व साखरेचे प्रमाण योग्य राखण्यासाठी जवस हे रोज खावे.
लहान मुलांना रोज सकाळी दुधामध्ये एक चमचा जवसाची पावडर मिक्स करून दिली तर त्यांचे अभ्यासा मधील लक्ष वाढते व त्याच्या बुद्धीचा विकास होतो.
जवसाची चटणी बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट
वाढणी: १ कप बनते
साहित्य:
१ कप जवस
१२-१५ लसून पाकळ्या
१ टी स्पून जिरे
१ टी स्पून लाल मिरची पावडर किंवा तिखट आवडत असल्यास अजून १/२ टी स्पून
१/२ कप कडीपत्ता पाने
मीठ चवीने
कृती:
प्रथम जवसाचे बी निवडून घेवून एका कढई मध्ये मंद विस्तवावर भाजून घेवून थंड करायला बाजूला ठेवा. लसून सोलून चिरून घ्या.
मिक्सरच्या भांड्यात भाजून थंड केलेले जवस, चिरलेला लसून, जिरे, लाल मिरची पावडर, कडीपत्ता व मीठ घालून बारीक वाटून घ्या.
जवसाची चटणी भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर सुद्धा सर्व्ह करता येते.