बेसिक आईसक्रिम: बेसिक आईसक्रिम म्हणजे आईसक्रिम बनवण्याच्या आगोदारचा बेस होय. हा बेस बनवून ठेवला की आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा पाहिजे त्या प्रकारचे सॉफटी आईसक्रिम बनवू शकतो. हा बेस आपण १५-२० दिवस सुद्धा ठेवू शकता. बेसिक आईसक्रिम हे SOFTY आईसक्रिम बनवण्यासाठी वापरायचे आहे. SOFTY आईसक्रिम मध्ये आपण आंबा, सीताफळ, व्हनीला, Strawberry, चॉकलेट, बटर स्कॉच अशी वेगवेगळी बनवू शकतो.
The English language version of the same basic ice cream making recipe can be seen here – Recipe for Basic Ice Cream
बनवण्यासाठी वेळ: १५-२० मिनिट
सेट करण्यासाठी वेळ: ७-८ तास
वाढणी: १२-१५ जणांना
साहित्य:
बेसिक आईसक्रिम:
२ १/२ कप दुध (गाईचे) किंवा १/२ लिटर
५ टे स्पून साखर
२ टे स्पून मिल्क पावडर
१ १/२ टे स्पून कॉर्नफ्लोर
१ १/२ टे स्पून GMS पावडर
१/८ टी स्पून स्टॅबिलायझर पावडर
कृती:
पाव लिटर दुध तापवायला ठेवा. उरलेल्या दुधात साखर, मिल्क पावडर, कॉर्नफ्लोर, GMS पावडर, स्टॅबिलायझर पावडर घालून मिक्स करून गरम करत ठेवलेल्या दुधात मिक्स करून पाच मिनिट दुध मंद विस्तवावर हलवत गरम करून घ्या. मिश्रण गरम झाल्यावर थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर डीप फ्रीझमध्ये ७-८ तास सेट करायला ठेवा.
बेसिक आईसक्रिम सेट झाल्यावर बाहेर काढून त्याचे तुकडे करून त्यामध्ये क्रीम घालून पाहिजे त्या प्रकारचे आईसक्रिम बनवू शकता.