सोया कटलेट्स: सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहेत. तसेच विटामीन, विटामीन-ए व बी, खनिजपण आहेत. आपल्याला माहीत आहे का सोयाबीन मध्ये नॉनव्हेज पेक्षा जास्त प्रोटीन आहेत. सोयाबीनच्या सेवनाने उच्च रक्तदाब, हृदयासाठी व ज्यांना मधुमेह आहे त्यांना हे खूप गुणकारी आहे.
सोया कटलेट बनवण्यासाठी मी सोया चक वापरले आहेत व बटाटे वापरण्याच्या आयवजी चणाडाळ वापरली आहे. हे कटलेट बनवायला सोपे आहेत व सगळ्यांना नक्की आवडतील.
The English language version of this Cutlets Recipe can be seen here – Healthy and Delicious Soya Beans Cutlets
The Marathi video of this soya cutlets recipe can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=kJXNLGgZBd8
बनवण्यासाठी वेळ: ५० मिनिट
वाढणी: १५-१८
साहित्य:
१ कप चणाडाळ
३/४ कप सोया चंक
३ कप पाणी
१ मध्यम आकाराचा कांदा
१ टे स्पून आले-लसूण पेस्ट
३ हिरव्या मिरच्या (चिरून)
१/४ कप कोथंबीर (चिरून)
१/४ कप पुदिना पाने (चिरून)
१ टे स्पून तेल
मीठ चवीने
तेल कटलेट शालो फ्राय करण्यासाठी
२-३ ब्रेड स्लाईस
कृती:
चणाडाळ धुवून ३० मिनिट भिजत ठेवा, मग प्रेशर कुकरमध्ये भिजवलेली चणाडाळ व सोय चंक थोडेसे कुटून घालावे व ३ कप पाणी घालून डाळ चांगली ८-१० मिनिट मध्यम आचेवर शिजवून घ्यावी. हिरवी मिरची, कोथंबीर, पुदिना चिरून घ्या.
चणाडाळ शिजली की बाजूला काढून थंड करायला ठेवा मग मिक्सरमध्ये वाटून घ्या.
एका कढई मध्ये १ टे स्पून तेल गरम करून चिरलेला कांदा, आले-लसूण-हिरवी मिरची घालून १-२ मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये मीठ, कोथंबीर, पुदिना, वाटलेली डाळ, घालून दालचीनी पावडर घालून मिक्स करून मिश्रण थोडे गरम घ्या. मग बनवलेल्या सारणाचे मध्यम आकाराचे गोळे बनवून घ्या. एका बाउलमध्ये ब्रेड क्रम घेवून एक एक गोळा गोळून बाजूला ठेवा.
नॉनस्टिक पॅन गरम करून थोडेसे तेल लावून बनवलेले कटलेट पॅनवर ठेवा बाजूनी थोडे थोडे तेल सोडून छान दोनी बाजूनी कुरकुरीत भाजून घ्या.
गरम गरम सोया चंक कटलेट सर्व्ह करा.