टोफू (सोया पनीर स्टिक) हा एक नाश्त्याला किंवा स्टारटर म्हणून छान पदार्थ आहे. टोफू म्हणजे सोयाबीन पनीर, सोया पनीर हे खूप पौस्टिक असते. सोया पनीरच्या सेवनाचे बरेच फायदे आहेत. सोया पनीर मध्ये प्रोटीन ची मात्रा मुबलक प्रमाणात असते. हे ब्याड कोलेस्टेरॉल साठी खूप छान आहे. तसेच ब्रेस्ट कॅन्सर होऊ नये म्हणून टोफू चे सेवन करावे.
The English language version of the same Tofu recipe can be seen here – Tasty Fried Tofu Paneer Sticks
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणांनसाठी
साहीत्य:
२०० ग्राम सोया पनीर (उभ्या स्टिक कापणे )
१/४ कप मक्याचे पीठ १/४ कप कांदा पेस्ट
२ टेबल स्पून आल पेस्ट
२ लाल सुकी मिरची पेस्ट करून
१ टी स्पून शेजवान सॉस
१ टी स्पून सोया सॉस
१ टी स्पून पांढरी मिरी पावडर
१ टी स्पून ब्रुथ पावडर
१/४ कप कांदा पात (कापून)
१/४ कप तेल तळण्यासाठी
कृती:
सोया पनीरचे उभे तुकडे करून त्याला मका पीठ, ब्रूथ पावडर, मीठ, मिरी पावडर व थोडे पाणी टाकून १/२ तास मुरत ठेवा.
फ्राईग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा पेस्ट, आल-लसून पेस्ट, लाल मीरची पेस्ट ५ मिनीट भाजुन घ्या व त्यामध्ये शेजवान सॉस, सोया सॉस टाकून मग सोया पनीरचे तुकडे टाका व चांगले फ्राय करून घ्या.
सर्व्ह करताना त्यावरती कांदा पात व पांढरी मिरी पावडर टाकून सजवा व चिली सॉस बरोबर द्या.