Crispy Lettuce Pakora Recipe in Marathi

Lettuce Pakoda
Crispy Lettuce Pakora

लेट्युसचे पकोडे: लेट्युसचे आपण नेहमी सलाड म्हणून वापर करतो किंवा त्याची कोशंबीर बनवत असतो. पण त्याची भजी करून बघा खूप छान टेस्टी लागते.ह्याला आपण आईसबर्ग सुद्धा म्हणतो. युरोप मध्ये हे सालड म्हणून खूप वापरले जाते. आपण बर्गर मध्ये सुद्धा ह्याचा वापर करतो. ते नुसते खायला पण छान क्रंची लागते. यातून आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्त्व तसंच लोह, कॅल्शियम, सोडिअम, पोटॅशियम ही पोषकतत्त्वं मिळतात. तसेच आपल्या रक्तातील कोलेस्टेरॉलची मात्रा पण कमी होते.

The English language version of this Pakoda recipe can be seen here – Lettuce Pakora

बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी

साहित्य:
१ जुडी लेट्युसची पाने
१ कप बेसन
१/४ कप तांदळाचे पीठ
१ मध्यम आकाराचा कांदा
थोडी कोथंबीर
१ टे स्पून तूप
१/४ टी स्पून हळद
३ हिरव्या मिरच्या
मीठ चवीने
एक चिमुट सोडा
तेल पकोडे तळण्यासाठी

Lettuce Pakoda
Crispy Lettuce Pakora

कृती:
लेट्युसची पाने स्वच्छ धवून घ्या. लेट्युसची पाने, कांदा, हिरवी मिरची बारीक चिरून घ्या. मग त्यामध्ये मीठ हळद, मीठ व गरम कडकडीत तूप घालून मिक्स करून त्यामध्ये बेसन, तांदळाचे पीठ, कोथंबीर व थोडे पाणी घालून थोडेसे घट्ट सर भजाचे मिश्रण बनवून घ्या.

कढईमधे तेल चांगले गरम करून घेऊन त्यामध्ये भिजवलेल्या पाठाचे गोळे घालून ब्राऊन रंगावर तळून घ्या.

गरम गरम लेट्युसचे पकोडे नारळाच्या चटणी बरोबर सर्व्ह करा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.