बटाट्याचे पकोडे: बटाट्याचे पकोडे हे डीपफ्राय करून छान कुरकुरीत लागतात पण त्याला तळताना तेल सुद्धा जास्त लागते. जर आपण बटाट्याचे पकोडे शालो फ्राय केले तर तेल सुद्धा कमी लागेल व चवीस्ट सुद्धा लागतात करून बघा नक्की सगळ्याला आवडतील. भजी बनवतांना थोडा रवा घातला की भजी छान कुरकुरीत होतात.
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ मोठ्या आकाराचा बटाटा
१ कप बेसन
२ टे स्पून बारीक रवा
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/२ टी स्पून धने-जिरे पावडर
१ हिरवी मिरची (बारीक चिरून)
१ टे स्पून कोथंबीर (चिरून)
मीठ
१ टे स्पून तेल (गरम)
तेल भाजी शालो फ्राय करण्यासाठी
कृती:
प्रथम बटाटे धुवून त्याची साले काढा व बटाट्याच्या गोल-गोल थोड्या जाडसर चकत्या करून मिठाच्या पाण्यात २ मिनिट ठेवा.
एका बाउलमध्ये बेसन, रवा, लाल मिरची पावडर, धने-जिरे पूड, हिरवी मिरची, कोथंबीर, मीठ, गरम कडकडीत तेल घालून मिक्स करून घ्या. मग थोडेसे पाणी घालून मिश्रण थोडे घट्ट सर भिजवून घ्या.
नॉन स्टिक तवा गरम झालाकी त्यावर थोडेसे तेल लावा. एक चकती घेवून बेसनच्या मिश्रणात बुडवून नॉन स्टिक तव्यावर ठेवा, अश्या प्रकारे जेव्ह्ड्या चकत्या बसतील तेव्हड्या ठेवा. बाजूनी थोडेसे तेल सोडून मंद विस्तवावर दोनी बाजूनी भजी फ्राय करून घ्या.
गरम गरम शालो फ्राय बटाट्याची भजी टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.