दाल पकवान: दाल पकवान ही एक नाश्त्याला बनवण्याची डीश आहे. दाल पकवान ही डीश सिंध ह्या प्रांतातील लोकप्रिय डीश आहे. म्हणजेच सिंधी लोकांचा अगदी आवडतीचा पदार्थ आहे.
दाल पकवान ही डीश मी माझ्या एका मैत्रिणी कडे खाल्ली होती व ती डीश मला खूप आवडली. दाल ही चणाडाळ वापरून बनवली आहे व पकवान म्हणजे पुरी पण ही पुरी छान कुरकुरीत असते त्यामुळे चवीस्ट लागते.दाल पकवानही डीश नाश्त्याला जरी बनवत असली तरी आपण इतर वेळी सुद्धा बनवू शकतो. पण सुटीच्या दिवशी हा पदार्थ बनवायला छान आहे.
The English language version of the same recipe can be seen here – Traditional Sindhi Dal Pakwan
बनवण्यासाठी वेळ: ५० मिनिट
वाढणी: १२-१५ पुऱ्या बनतात
साहित्य:
दाल बनवण्यासाठी:
१ कप चणाडाळ
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/२ टी स्पून गरम मसाला
१/४ टी स्पून हळद
१ टी स्पून आमचूर पावडर
मीठ चवीने
१/४ कप कोथंबीर
१ मध्यम आकाराचा कांदा
फोडणी करीता:
१ टे स्पून तेल
१ टी स्पून जिरे
२ हिरव्या मिरच्या
८-१० कडीपत्ता पाने
१/२ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून गरम मसाला
पकवान बनवण्याकरीता:
१ १/२ कप मैदा
२ टे स्पून गव्हाचे पीठ
२ टे स्पून बारीक रवा
१ टी स्पून जिरे
१०-१२ काळे मिरे (जाडसर कुटून)
१ टे स्पून तेल (कडकडीत)
१/४ कप दुध
मीठ चवीने
तेल पुरी तळण्यासाठी
कृती:
प्रथम चणाडाळ धुऊन १ तास पाण्यात भिजत ठेवा. मग चणाडाळ शिजवून घ्य. कुकरमध्ये शिजवली तरी चालेल पण खूप शिजता कामा नये थोडी बोट चेपी शिजली पाहिजे.
एका बाउल मध्ये मैदा, गव्हाचे पीठ, रवा, मीठ, काळे मिरे, जिरे, मीठ मिक्स करून त्यामध्ये गरम कडकडीत तेल घालून मिक्स करून त्यामध्ये दुध व थोडे पाणी घालून चांगले घट्ट पीठ मळून १५ मिनिट बाजूला झाकून ठेवा.
कांदा, कोथंबीर धुवून चिरून घ्या. हिरवी मिरची चिरून घ्या.
एका कढईमध्ये शिजलेली चणाडाळ, लाल मिरची पावडर, गरम मसाला, मीठ व १/२ कप पाणी घालून ५ मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्या.
दुसऱ्या एका कढईमधे तेल गरम करून जिरे, कडीपत्ता, हिरवी मिरची घालून मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला घालून मिक्स करून शिजवलेली डाळ घालून मिक्स करून चांगली दणदणीत वाफ येवू द्या.
कढईमधे तेल गरम करायला ठेवा. बनवलेल्या पीठाचे छोटे-छोटे गोळे बनवून घ्या. एक गोळा घेवून छोटी पातळ पुरी लाटून घेवून तिला काटे चमच्यानी टोचे मारून पुरी बाजूला ठेवा. अश्या प्रकारे सर्व पुऱ्या लाटून घ्या. तेल चांगले गरम झाले की पुऱ्या छान ब्राऊन रंगावर तळून घ्या.
गरम गरम दाल पकवान सर्व्ह करा. दाल पकवान सर्व्ह करताना पुरी वरती दाल पसरवून चिरलेली कोथंबीर व कांदा घालून सजवा.