बेबी कॉर्न टेम्पुरा: बेबी कॉर्न टेम्पुरा ही नाश्त्याला किंवा पार्टीला स्टाररट म्हणून बनवायला छान डीश आहे. टेम्पुरा पावडर व ब्रुथ पावडरने ह्या डीशला अगदी उत्कृष्ट चव येते. लहान मुले अगदी आवडीने खातात. बेबी कॉर्न टेम्पुरा हे नेहमी डीप फ्राय करायला पाहिजे असे नाही ते आपण नॉन स्टिक तव्यावर शालो फ्राय सुद्धा करू शकतो. हे छान कुरकुरीत लागतात. बेबी कॉर्न टेम्पुरा हे थाय स्टाईलने बनवले आहे.
The English language version of the same Thai Dish can be seen here – Deep Fried Baby Corn Tempura
बनवन्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: १२ बनतात
साहीत्य :
१२ बेबी कॉर्न
१ कप टेम्पुरा पावडर
१/४ कप गार पाणी
१ टी स्पून ब्रुथ पावडर
१/२ टी स्पून पांढरी मिरी पावडर
मीठ चवीनुसार
१ टी स्पून आल पेस्ट
१ टी स्पून पांढरी वाईन
तेल बेबी कॉर्न टेम्पुरा तळण्यासाठी
कृती:
एका बाउल मध्ये हे सर्व साहित्य एकत्र करून १० मिनिट तसेच बाजूला ठेऊन द्या.
एका कढईमध्ये तेल गरम करून घेवून बेबी कॉर्न टेम्पुरा छान गुलाबीसर रंगावर कुरकुरीत डीप फ्राय करून घ्या.
गरम गरम बेबी कॉर्न टेम्पुरा चिली सॉस बरोबर सर्व्ह करा.