तीनरंगी रवा-नारळ बेक करंजी: आज कालच्या लाईफ स्ताईल मध्ये बराच फरक झाला आहे. एक म्हणजे आजकाल सगळे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप चोखादनल झाले आहेत. आज काल तेल,तूप, साखर, मसालेदार खाणे बरेच कमी झाले आहे.
बेक करंजी ही सुद्धा छान लागते. ह्या मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे सारण भरून बनवू शकतो. बेक करंजी बनवतांना ओल्या नारळाचे सारण बनवले आहे. नारळ, दुध व साखर आटवून घेवून सारण बनवले आहे. आवरणा करीता रवा वापरला आहे. तसेच ह्या करंज्या पुडाच्या करंज्या सारख्या किंवा layered Karanjee सारख्या बनवल्या आहेत. बेक करंज्या चवीला छान लागतात.
तीनरंगी रवा-नारळ बेक करंजी ह्या दिवाळीच्या फराळाकरीता बनवा खूप छान दिसेल व चवीस्ट सुद्धा लागेल.
The English version of this Karanji Recipe can be seen here – Tricolor Baked Karanji
बनवण्यासाठी वेळ: ९० मिनिट
वाढणी: १८-२०
साहित्य:
सारणाकरीता:
१ मोठ्या आकाराचा नारळ (खोवून)
१/२ लिटर दुध (म्हशीचे)
१/२ कप साखर
१ टी स्पून वेलचीपूड
८-१० बदाम (थोडे बारीक करून)
८-१० काजू (थोडे बारीक करून)
२ टे स्पून बेदाणे
आवरणाकरीता:
२ कप रवा (बारीक)
१/२ कप तूप
१ टी स्पून बेकिंग पावडर
१/४ कप दुध
मीठ चवीने
२-२ थेंब खाण्याचा रंग (हिरवा, ऑरेंज किंवा पिवळा)
साठ्यासाठी:
४ टे स्पून कॉर्नफ्लोर
४ टे स्पून तूप/ वनस्पती तूप
कृती:
सारणा करीता: प्रथम नारळ खोऊन घेऊन एका कढईमधे काढून घ्या. मग त्यामध्ये दुध व साखर घालून घट्ट होई परंत मध्यम आचेवर शिजवत ठेवा म्हणजे सारण थोडेसे कोरडे झाले पाहिजे. विस्तव बंद करून सारण थंड करायला बाजूला ठेवा. मिश्रण थंड झाल्यावर थोडे मिक्सर मधून काढून त्यामध्ये काजू, बदाम, वेलचीपूड व बेदाणे घालून मिक्स करून घ्या. हे सारण शिजवलेले असल्यामुळे फ्रीजमध्ये बरेच दिवस चांगले राहू शकते.
साठ्यारीता: एका स्टीलच्या प्लेट मध्ये तूप चांगले बोटानी फेटून घेवून त्यामध्ये कॉर्नफ्लोर मिक्स करून घ्या.
आवरणाकरीता: एका परातीमध्ये बारीक रवा, मीठ व बेकिंग पावडर व विरघळलेले तूप मिक्स करून त्याचे तीन भाग करा.
एका भागामध्ये हिरवा रंग घालून त्यामध्ये थोडे दुध व थोडे पाणी मिक्स करून पीठ मळून घ्या. दुसऱ्या भागामध्ये ऑरेंज किंवा पिवळा रंग घालून दुध व पाणी घालून पीठ मळून घ्या.
तिसरा भाग पांढराच मळून घ्या. पीठ जास्त घट्ट न मळता मध्यम मळून २०-३० मिनिट बाजूला ठेवावे व मग थोडेसे कुटून घ्या किंवा मिक्सरमधून वेगवेगळे काढून घ्या. मग प्रतेक पीठाचे दोन एक सारखे गोळे बनवा. पहिले तीन गोळे म्हणजे हिरवा, पिवळा व पांढरा पोळी सारखे लाटून घ्या. एक पोळी घेवून त्यावर ३/४ टे स्पून साटा लावून एक सारखा पोळीवर पसरवून घ्या. त्यावर दुसरी पोळी ठेवून त्यालापण साटा लावून त्यावर तिसरी पोळी ठेवून त्याला सुद्धा साटा लावून त्याचा एकत्र घट्ट रोल बनवा. मग त्या रोलचे एक सारखे १” आकाराच्या लाट्या कापून घ्या. अश्या प्रकारे दुसरा सुद्धा रोल बनवून कापून घ्या.
करंजी बनवण्याकरीता: एक लाटी घेवून layered भाग वरती ठेवून हळूवारपणे छोट्या पुरी सारखा लाटून १ टे स्पून सारण भरून पुरीच्या कडांना अगदी थोडेसे दुध किंवा पाणी लावून पुरी मुडपून घ्या. मग ओल्या कापडात ठेवा कारण रव्याची करंजी लवकर सुकते म्हणून ओल्या कापडात ठेवावी. अश्या प्रकारे १० करंज्या बनवून घ्या.
माईक्रोवेव प्रीहीट करून घेवून १८० डेग्रीवर २५ मिनिट सेट करून एका बेकीग प्लेट मध्ये करंज्या ठेवून बेक करून घ्या. मधून एकदा माईक्रोवेव उघडून करंज्या पलटून घ्या.
बेक झाल्यावर थंड करायला बाजूला ठेवा. अश्या प्रकारे सर्व करंज्या बनवून बेक करून घ्या.
बेक करंज्या थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा.