झटपट चिकन पिझा: पिझा म्हंटले की तोंडाला पाणी सुटते. पिझा हा लहान मुलांना तसेच मोठ्या लोकांना सुद्धा आवडतो. ह्या आगोदर आपण शाकाहारी पिझ्झा बघितला आता आपण चिकन पिझा कसा बनवायचा ते बघुया.
चिकन पिझ्झा बनवण्यासाठी प्रथम चिकनला आले-लसूण-हिरवी पेस्ट, लिंबू, मीठ, लाल मिरची, हळद व चिकन तंदुरी मसाला व एक टे स्पून तेल मिक्स करून ३० मिनिट फ्रीजमध्ये झाकून ठेवले.
पुदिना हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे त्याची चटणी लावून टोमाटो सॉस लावला व वरतून चीज घालून बेक करून घेतले.
बेक करण्यासाठी मी ओव्हन किंवा माईक्रोवेव्ह वापरला नाही त्या आयवजी विस्तवावर नॉन स्टिक panमध्ये बेक करून घेतले त्यामुळे ५-७ मिनिटात पिझा तयार झाला व छान क्रिस्पी सुद्धा झाला. ह्याला आपण चिकन झटपट पिझ्झा सुद्धा म्हणू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: ५० मिनिट
वाढणी: ३ पिझ्झा
साहित्य:
३ पिझ्झा बेस
२०० ग्राम बोनलेस चिकन
१ १/२ टी स्पून तेल
१ टे स्पून आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
१ टी स्पून लाल मिरची पेस्ट
१ टी स्पून तंदुरी चिकन मसाला
मीठ चवीने
१ टे स्पून बटर
२ चीज क्यूब (किसून)
१/४ कप टोमाटो सॉस
चटणी करीता :
१/२ कप पुदिना पाने
१/४ कप कोथंबीर
१ हिरवी मिरची
७-८ लसून पाकळ्या
लिंबू,साखर व मीठ चवीने
कृती: चिकन धुवून बाजूला ठेवा. मग त्याचे छोटे-छोटे तुकडे करा. कांदा बारीक चिरून घ्या. चीज किसून घ्या.
एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये कांदा घालून १ मिनिट परतून घेऊन आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, लाल मिरची पावडर, मीठ घालून परत १ मिनिट परतून घ्या त्यामध्ये चिकनचे तुकडे घालून मंद विस्तवावर ५ मिनिट शिजवून घेवून १/४ कप पाणी घालून परत मंद विस्तवावर शिजवून चिकन शिजवून घ्या. चिकन शिजले की त्यामध्ये चिकन तंदुरी मसाला घालून थोडे परतून घ्या.
पुदिना चटणी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. शिजवलेल्या चिकनचे तीन भाग करून घ्या.
एक पिझ्झा घेवून त्यावर १ टे स्पून पुदिना चटणी लावून त्यावर १ टे स्पून टोमाटो सॉस पसरवून चिकनचा एक भाग पसरवून त्यावर किसलेले चीज घाला.
नॉन स्टिक पॅन गरम करायला ठेवा. त्याला आतून थोडे बटर लाऊन त्यावर पिझ्झा ठेवून पॅनवर झाकण ठेवून मंद विस्तवावर ७-८ मिनिट बेक करून घ्या. गरम गरम पिझ्झा सर्व्ह करा.
जर माईक्रोवेव मध्ये पिझ्झा बनवायचा असेल तर प्रथम माईक्रोवेव प्रीहिट करून १८० डिग्री वर १५ मिनिट सेट करून नॉन स्टिक पॅन वर पिझ्झा ठेवून बेक करून घ्या.
गरम गरम चिकन पिझ्झा सर्व्ह करा.