दाल शोरबा: दाल शोरबा हे पंजाब ह्या प्रांतात लोकप्रिय आहे. थंडीच्या दिवसात संध्याकाळी अश्या प्रकारचे दाल शोरबा अगदी आवर्जून बनवतात. ह्या नारळाच्या तेलाची फोडणी केली आहे त्यामुळे दाल शोरबाची टेस्ट अगदी वेगळी लागते. तसेच गरम मसाला आयवजी मद्रास करी मसाला वापरला आहे.
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी : ४ जणासाठी
साहित्य:
१ कप तुरीची डाळ
१/२ कप मसूर डाळ
२ टे स्पून कोकनट ऑईल
१५-२० कडीपत्ता पाने
२ टी स्पून मोहरी
१/२ टी स्पून हिंग
१/२ कप कांदा (चिरून)
७-८ लसून
१ टे स्पून मद्रास करी मसाला
१ टी स्पून हळद
१ टे स्पून चिंच (कोळ)
१/४ कप कोथंबीर (चिरून)
कृती: एका कुकरच्या भांड्यात तुरीची डाळ व मसूर डाळ एकत्र करून चांगली धुवून घेऊन त्यामध्ये डबल पाणी व हळद घालून ३ शिट्या द्या.
एका कढईमधे खोबरेल तेल गरम करून त्यामध्ये हिंग, मोहरी, कडीपत्ता पाने, चिरलेला कांदा व लसून घालून मंद विस्तवावर गुलाबी रंगावर परतून घ्या.
मग त्यामध्ये मद्रास करी पावडर घालून मिक्स करून शिजवलेली डाळ घालून ५-७ मिनिट उकळी येईस तोवर शिजवून घ्या.
थोडे पातळ करण्यासाठी पाणी गरज असेल तर घालू शकता.
मग त्यामध्ये चिंचेचा कोळ घालून मिक्स करून वरतून कोथंबीरीने सजवून गरम गरम सर्व्ह करा.