ज्वारीच्या पीठाचे डोसे: ज्वारीच्या पीठाचे डोसे ही एक नाश्त्याला किंवा जेवणात सुद्धा बनवू शकतो. लहान मुले भाकरी खायचा कंटाळा करतात किंवा त्यांना ती आवडत नाही. ज्वारीमध्ये पोषक घटक व चरबीचा भाग असतो. ज्वारीही थंड व रुक्ष असल्याने वायुकारक असते. तसेच तिचा वापर रोजच्या जेवणात केल्याने टी आरोग्य कारक असते. ज्वारी ही थंड ,रुक्ष , मधुर, पिक्तशामक रक्तविकार, दूर करणारी आहे.
The English language version of this Dosa Recipe can be seen here – Crispy Millet Flour Dosa
बनवण्यासाठी वेळ: ४० मिनिट
वाढणी ४ जणासाठी
साहित्य:
२ कप ज्वारीचे पीठ
१ कप तांदळाचे पीठ
१/२ कप बारेक रवा
४ हिरव्या मिरच्या
१” आले तुकडा
१ टी स्पून जिरे
१/४ कप कोथंबीर (चिरून)
मीठ चवीने
तेल डोसा भाजण्यासाठी
कृती:
ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ, रवा,मीठ व पाणी घालून भजाच्या पीठा सारखे भिजवून ३० मिनिट झाकून बाजूला ठेवा.
हिरवी मिरची, आले, जिरे बारीक वाटून घ्या. कोथंबीर बारीक चिरून घ्या.
ज्वारीच्या भिजवलेल्या पिठात वाटलेले आले-हिरवी मिरची व कोथंबीर घालून मिक्स करून घ्या.
नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर एक टी स्पून तेल लावून १/२ कप भिजवलेले पीठ घालून तव्यावर पसरवून घ्या. बाजूनी थोडेसे तेल सोडा. डोसा दोनी छान भाजून घ्या.
गरम गरम डोसा पुदिना चटणीबरोबर सर्व्ह करा.
पुदिना चटणी रेसिपी इथे पहा- पुदिना चटणी
The video in Marathi on the preparation of these Jowar Flour Dosa / Amboli / Ghavan can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=NIHRfkS9tVw