ग्रीन टी विथ टर्मरिक: ग्रीन टी विथ टर्मरिक ह्यामध्ये ग्रीन टी पावडर बरोबर हळद व दालचीनी वापरली आहे. आपण रोज सकाळी अश्या प्रकारचा चहा घेतला तर आपल्या शरीराला ह्यापासून बरेच फायदे मिळतात.
आपले आरोग्य निरोगी राहून आपली त्वचा निरोगी राहून तजेलदार दिसते. तसेच आपल्या शरीरातील विषारी घटक निघून जातात व आपले शरीर निरोगी होते. तसेच ह्यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती पण वाढते.
बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट
वाढणी: २ जणासाठी
साहित्य:
२ कप पाणी
१ ग्रीन टी बँँग
१/४ टी स्पून हळद
१/२” दालचीनी तुकडा
कृती:
एका स्टीलच्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवा. पाणी गरम झालेकी त्यामध्ये हळद व दालचीनी घालून चांगली उकळी येऊ द्या.
उकळी आलीकी एका ग्लास मध्ये किंवा कपामध्ये हे पाणी गाळून घेवून त्यामध्ये ग्रीन टी बँँग घालून २-३ मिनिट तसेच ठेवा पाण्याचा रंग बदलला की सर्व्ह करा.