लेमन-जिंजर-हनी टी: लेमन-जिंजर-हनी टी अश्या प्रकारचा चहा बनवताना आले किसून, लिंबूरस, व साखर आयवजी मध वापरले आहे ह्यामुळे आपले शरीर निरोगी रहाते व रोग प्रतिकारशक्ती वाढते. तसेच आपली त्वचा निरोगी राहून त्याला एक प्रकारची चकाकी येते. आल्यामुळे आपल्या पोटातील गँस निघून आपले पोट साफ होते. सकाळी उठल्यावर अश्या प्रकारचा चहा घेतला तर त्याचे फायदे चागले होतात. चहा कोमट झाल्यावर मग त्यामध्ये मध मिक्स करून घ्या.
The English language recipe of the same tea preparation can be seen here – Healthy Nimbu Adrak Shahad Ki Chai
बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट
वाढणी: २ कप
साहित्य:
२ कप पाणी
१ टी स्पून ग्रीन टी चहा पावडर
१/२ लिंबू (रस काढून)
१” आले (किसून)
१/२ टे स्पून मध
कृती: दोन कप पाणी गरम करायला ठेवा. मग त्यामध्ये चहा पावडर, आले घालून ५-७ मिनिट मंद विस्तवावर उकळून घ्या मग एका मग मध्ये गाळून थोडे कोमट झाल्यावर त्यामध्ये लिंबूरस व मध घालून मिक्स करून सर्व्ह करा.