चटपटा पंचम शेव चाट: पंचम शेव चाट हा पदार्थ दुपारी चहा बरोबर किंवा कीटी पार्टीला किंवा मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीला बनवायला छान आहे.
पंचम शेव चाट बनवतांना ह्यामध्ये छोटे-छोटे दाल पकोडे बनवून त्यावर खजूर चिंच चटणी, हिरवी चटणी, कांदा, टोमाटो कोथंबीर ने सजवून कोबी पातळ चिरून घातला आहे व वरतून शेव घातली आहे.
पंचम शेव चाट खाल्यावर जरा हलकाच आहार घ्यावा. म्हणजे सूप, फ्रुट जूस, किंवा मसाला ताक.
पंचम चाट बनवताना जे पकोडे बनवले आहेत त्यामध्ये मसूर डाळ, हरबरा डाळ, मुग डाळ, तूर डाळ ह्याचे पीठ वापरले आहे.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ कप मसूर डाळ
१/२ कप हरबरा डाळ
१/४ कप मुग डाळ
१ टे स्पून उडीदडाळ
१/२ टी स्पून ओवा पावडर
१/४ टी स्पून हिंग
१ टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
२ टे स्पून तेल
तेल पकोडे तळण्यासाठी
सजावटीसाठी:
चिंच खजूर चटणी
हिरवी चटणी
कांदा-टोमाटो-कोथंबीर (चिरून)
बारीक शेव
कृती:
प्रथम मसूरडाळ, चणाडाळ, मुगडाळ, उडीदडाळ बारीक दळून घ्या.
एका बाऊलमध्ये दळलेले पीठ, ओवा पूड, हिंग, मीठ, लाल मिरची पावडर, मीठ व २ टे स्पून थंड तेल घालून मिक्स करून घेवून कोमट पाण्यानी पीठ भिजवून गरम गरम तेलात छोटी छोटी भजी तळून घ्या.
एका मोठ्या प्लेटमध्ये तळलेली भजी, त्यावर चिरलेले कांदा-टोमाटो, खजूर चिंचेची चटणी, हिरवी चटणी व उभा पातळ कोबी चिरून घाला व वरतून बारीक शेव घालून सजवा. मग सर्व्ह करा.