कुकुंबर कप: कुकुंबर कप हे आपण सालड ह्याला छान पर्याय आहे. कुकुंबर कप दिसायला सुद्धा आकर्षक दिसतात. घरी पाहुणे येणार असतील किंवा घरी पार्टी आहे तेव्हा हे नक्की बनवा. टेबलवर दिसायला सुंदर व चवीस्ट लागतात.
अगदी कमी वेळात झटपट बनविला जाणारा पदार्थ आहे. कुकुंबर कप बनवताना काकडी, गाजर, स्वीट मक्याचे दाणे, कोबी किसून, टोमाटो चिरून, कांदा चिरून, डाळिंब दाणे, दही किंवा मियोनीज सॉस वापरला आहे.
कुकुंबर कप हे अगदी पौस्टिक आहेत कारण ह्यामध्ये काकडी, टोमाटो, कोबी, मक्याचे दाणे, कांदा व दही आहे. लहान मुलांना हे नक्की आवडेल. करून बघा. परत छान थंड केले की उन्हाळ्याच्या दिवसात अगदीच मस्त लागते.
The English language version of the same Salad recipe can be seen here – Stuffed Cucumber Cup Salad
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: १२ बनतात
साहित्य:
३ मोठ्या आकाराच्या ताज्या काकड्या
१ छोटे लाल चुटूक गाजर (किसून)
१/२ कप कोबी ताजा (किसून)
१/४ कप गोड मक्याचे दाणे (उकडून)
१/४ कप टोमाटो (चिरून)
२ टे स्पून कांदा (चिरून)
१/२ कप डाळिंब दाणे
१/२ टी स्पून जिरे पूड
लिंबूरस, साखर, मीठ चवीने
१/२ कप दही किंवा मियोनीज सॉस
सजावटीसाठी कोथंबीर व लाल मिरची पूड
कृती: प्रथम काकडी धुवून साले काढून त्याचे ३ इंचाचे गोल तुकडे करून घ्या. मग काकडी मधील गर काढून मोकळी जागा करा म्हणजे आपल्याला मोकळ्या जागेमध्ये सारण भरता येईल.
गाजर, कोबी किसून घ्या, स्वीट कॉर्नचे दाणे उकडून घ्या, कांदा बारीक चिरून घ्या, टोमाटो बिया काढून बारीक चिरून घ्या, जिरे भाजून पूड करून घ्या.
एका मोठ्या आकाराच्या बाऊलमध्ये वरील सर्व साहित्य मिक्स करून त्यामध्ये लिंबूरस, साखर, मीठ व दही घालून एक सारखे मिश्रण करून घ्या. आवडत असल्यास दही वापरण्याच्या आयवजी मीयोनीज सॉस वापरला तरी छान लागतो.
मिश्रण बनवल्या नंतर काकडीच्या मोकळ्या जागेमध्ये भरून त्याला कोथंबीर व लाल मिरची पूड वापरून सजवून फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा.
जेवतांना आयत्यावेळी सर्व्ह करा म्हणजे छान थंड थंड लागेल.