बुंदीचे लाडू: बुंदीचे लाडू म्हंटल की सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटते. आपण दिवाळी फराळा साठी घरच्या घरी हे लाडू बनवू शकतो. तसेच ते बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत. महाराष्टात सणावाराला, दिवाळीच्या फराळात किंवा लग्नाच्या वेळी अगदी आवर्जून बनवतात.
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: १५ लाडू बनतात
साहित्य:
२ कप बेसन
३ कप साखर
१५ हिरवे वेलदोडे
२ टे स्पून पिस्ते
२ टे स्पून तेल
२-३ थेंब लाल रंग
साजूक तूप बुंदी तळण्यासाठी
कृती:
प्रथम बेसन एका मोठ्या बाउलमध्ये चाळून घ्या. मग त्यामध्ये थोडे पाणी घालून मिक्स करून घेवून गुठळ्या काढून मग परत थोडे पाणी घालून परत चांगले फेटून घ्या. साधारणपणे दोन कप बेसन साठी १ १/४ कप पाणी व रंग घाला. मग १५ मिनिट मिश्रण बाजूला ठेवा.
पाक बनवण्यासाठी: ३ कप साखर व २ कप पाणी घालून मध्यम विस्तवावर पाक बनवायला ठेवा. मिश्रण सारखे हालवत ठेवा. पाक थोडा चिकट म्हणजे एक तारी बनवून घ्या. ‘
बुंदी बनवण्यासाठी: एका कढईमधे तूप गरम करून बुंदीच्या झार्यानी गरम तुपामध्ये बुंदी पडून घ्या. मग गोल्डन रंगावर बुंदी तळून घ्या. सगळी बुंदी तळून झाल्यावर बुंदी, पिस्त्याचे तुकडे, वेलची तयार पाकामध्ये घालून मिक्स करून २५-३० मिनिट झाकून ठेवा. मग त्याचे एक सारखे लाडू बनवून एका परातीत उघडेच ४-५ तास ठेवा.
लाडू थोडे सुकल्यावर स्टीलच्या डब्यात भरून ठेवा.