सकाळ न्यूजपेपर समुहा तर्फे श्री जाधव, श्री वाघ व त्यांचे सहकारी यांनी शनिवार दिनांक १३ ऑक्टोबर २०१८ रोजी दुपारी ५:३० वाजता त्वष्टा कासार समाज संस्था गणेशोत्सवतर्फे महिलांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पाककला स्पर्धेचे नियोजन छान करण्यात आले होते. सकाळ समूह नेहमी महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करीत असतात. पण महिलांचा सर्वात आवडतीचा विषय म्हणजे विविध पदार्थ बनवणे व ह्या विविध पदार्थ बनवण्याच्या स्पर्धा ठेवल्या तर महिला अगदी खुश होतात.
मंडळाच्या कार्यक्रम समितीच्या उपाध्यक्ष गिरिजा पोटफोडे ह्यांचा ह्यामध्ये मोलाचा वाटा होता. तसेच या वेळी मंडळाचे अध्यक्ष सतीश करडे, कार्यावाहक दिलीप खुळे उपस्थित होते. गिरिजा पोटफोडे, अंजलेश वडके, मिलिंद पोटफोडे, अश्विनी वडके यांनी संयोजन केले.
त्वष्टा कासार समाज संस्था ह्यासंस्था मधील जवळ जवळ ४० महिलांनी पाककला स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानी नाना विध अगदी चवीस्ट पदार्थ बनवले होते. ह्या स्पर्धे मध्ये मुलीन पासून अगदी वयस्कर महिलांनी सुद्धा भाग घेतला होता. सगळ्या जनींचा सहभाग बघून छान वाटले.स्पर्धेमध्ये अगदी पारंपरिक पदार्थ पासून अगदी पास्ता सुद्धा बनवला होता. तसेच महिलांनी उखाणे घेतले व काही इतर स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या होत्या.
पाककला स्पर्धे मध्ये प्रथम पारितोषिक प्रियांका पेणकर ह्यांना उकडीचे मोदक, नयना दांडेकर( चकली) दुसरे पारितोषिक, तिसरे पारितोषिक स्वाती कोटकर (उपवासाचे मेंदू वडे) ह्या पदार्थाला मिळाले. तसेच अजून काही उतेजनार्थ बक्षीस सुद्धा देण्यात आली. ह्यामध्ये मोदकाचे कालवण, शाही मोदक, मलई सँडविच, मुगाचे कंदण वगैरे नानाविध पदार्थ बनवले होते. – Information on winners in Sakal
त्वष्टा कासार समाज संस्था गणेशोत्सवतर्फे महिलांसाठी पाक कला स्पर्धेचे परीक्षण करायला सुजाता नेरुरकर यांना बोलावले होते. एकंदरीत सकाळ न्यूजपेपर समुहाने महिलांसाठी छान स्पर्धा आयोजित केली होती.