साउथ इंडीयन फिल्टर कॉफी: साउथ इंडीयन फिल्टर कॉफी ही बनवायला अगदी सोपी आहे. कॉफीच्या बिया दळून त्याची पावडर बनवतात. ही पावडर कोणत्यापण किराणामालाच्या मालाच्या दुकानात सहज मिळू शकते.
फिल्टर कॉफी ही चवीला अगदी कडक व चवीस्ट लागते. पण अश्या प्रकारची कॉफी बनवण्यासाठी स्टीलचे भांडे पाहिजे. त्यामध्ये वरच्या भागात कॉफी पावडर घालून त्यावर चकती ठेवून वरती उकळते पाणी घालून वरचे झाकण लावावे १० मिनिटात भागातील डब्यात कॉफी चे पाणी साठून येईल ते मिश्रण गरम दुधात घालून कॉफी तयार करता येते.
The English language version of this coffee recipe can be seen here – Strong South Indian Filter Coffee
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: २ कप
साहित्य:
१ १/२ टे स्पून किंवा ३ टी स्पून फिल्टर कॉफी पावडर
१/२ कप उकळते पाणी
१ कप दुध
३ टी टी स्पून साखर
कृती: प्रथम पाणी गरम करायला ठेवा. मग स्टीलचे फिल्टर घेवून वरच्या भागामध्ये कॉफी पावडर घालून चकती ठेवून कॉफी थोडी दाबून त्यावर उकळते पाणी घालून झाकण लावून ठेवा. मग हळूहळू कॉफीचे पाणी खालील भागात साठून येईल.
एका स्टीलच्या भांड्यात दुध गरम करून त्यामध्ये साखर घालून एक उकळी आणा मग त्यामध्ये फिल्टर मधील कॉफीचे मिश्रण मिक्स करून एका भांड्यात कॉफी ओतून घ्या.
एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात कॉफी वर खाली केली की आपोआप फेस येतो.
मग गरम गरम कॉफी सर्व्ह करा.