गुलगुले: गुलगुले हा एक गोड पदार्थ आहे. आपण सणावाराला किंवा इतर दिवशी सुद्धा हा पदार्थ बनवू शकतो. अश्या प्रकारचे गुलगुले बनवतांना प्रथम पुरण बनवून घेतले आहे. मग वरील आवरणासाठी उडीद डाळीच्या पीठाचे आवरण बनवून आत मध्ये पुरण भरले आहे. हा एक छान नवीन गोड पदार्थ आहे.
बनवण्यासाठी वेळ:
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२ वाट्या शिजवलेले पुरण
५-६ काजू तुकडे (भरडून)
५-६ बदाम (भरडून)
२ वाट्या उडीद डाळचे पीठ
१ टी स्पून पिठीसाखर
१ टी स्पून जायफळ-वेलचीपूड
मीठ चवीने
तेल तळण्यासाठी
कृती:
प्रथम नेहमी प्रमाणे पुरण शिजवून वाटून घ्या. मग त्यामध्ये जायफळ-वेलचीपूड, काजू व बदाम भरड घालून एक सारखे मिश्रण करून घ्या.
उडीद डाळीच्या पीठामध्ये मीठ, १ टी स्पून गरम तेल व पिठीसाखर व पाणी घालून भजाच्या पीठाप्रमाणे भिजवून घ्या.
तेल गरम करायला ठेवा. पुरणाचे छोटे-छोटे गोळे बनवून उडीद डाळीच्या पीठामध्ये बुडवून गरम तेलामध्ये सोडा. मग छान खरपूस तळून घेवून गरम गरम सर्व्ह करा.