टेस्टी दाणे, मखाणे मावा भाजी: दाणे, मखाणे मावा भाजी बनवण्यासाठी शेंगदाणे, मखाणे, मावा, ड्रायफ्रुट, शिमला मिर्च, व टोमाटो वापरले आहेत. अश्या प्रकारची भाजी ही आपण सणवारांना किंवा घरी पार्टीला सुद्धा बनवू शकतो. ही भाजी पौस्टिक तर आहेच व चवीस्ट सुद्धा लागते.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी ४ जणासाठी
साहित्य:
१ कप शेंगदाणे
१ कप मखाणे
१/२ कप मावा किंवा खवा
१ टे स्पून किसमिस
१ मध्यम आकाराची शिमला मिर्च
२ मध्यम आकाराचे कांदे
२ लाल बुंद टोमाटो
१” आले तुकडा
१ टी स्पून धने-जिरे पावडर
१/२ टी स्पून गरम मसाला
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टे स्पून कोथंबीर
मीठ चवीने
१ टे स्पून तूप
१ टी स्पून जिरे
कृती:
एका भांड्यात पाणी व थोडेसे मीठ घालून शेगदाणे घालून उकळी आणा थंड झाल्यावर त्याची साले काढा. तुपावर मखाने भाजून घ्या. कांदा चिरून त्याची पेस्ट करून घ्या. टोमाटो उकडून त्याची प्युरी करून घ्या. शिमला मिर्च चिरून घ्या. आल्याचे उभे पातळ तुकडे करून घ्या.
एका कढईमधे तूप गरम करून जिरे घालून कांद्याची पेस्ट, टोमाटो प्युरी घालून थोडी परतून घ्या. नंतर त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद. धने=जिरे पावडर, गरम मसाला व मावा घालून दोन मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये शेंगदाणे, मखाने, शिमला मिर्च, किसमिस, घालून १ १/२ कप पाणी घालून तूप सुटे परंत शिजू द्या. कोथंबीर घालून सजवा.
गरम गरम दाणे, मखाणे मावा भाजी चपाती, पराठा, कुलचा, नान बरोबर सर्व्ह करा.