डीलीशियस खजुराच्या चंद्रकला: खजुराच्या चंद्रकला ही एक स्वीट डीश आहे. ह्यामध्ये करंजी बनवून त्यामध्ये खजूर सारण म्हणून भरला आहे. अश्या प्रकारच्या चंदकला आपण सणावाराला किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ४ जनासाठी
साहित्य:
२०० ग्राम मैदा
१/२ टी स्पून मीठ
५० ग्राम तूप (वनस्पती)
१ अंडे
५० ग्राम साखर
१ कप दुध
१ टी स्पून बेकिंग पावडर
तूप करंजी तळण्यासाठी
सारणासाठी:
२०० ग्राम सीडलेस खजूर
५० ग्राम काजू
५० ग्राम पिठीसाखर
कृती:
खजुराला मध्यभागी चीर पाडून त्यात चिमूटभर पिठीसाखर व एक काजू घालावा मग पिठीसाखरमध्ये घोळून ठेवावा.
दुध व साखर मिक्स करून गरम करून थंड करून घ्या. मैदा, मीठ व बेकिंग पावडर चालून घ्यावे. परातीत प्रथम तूप फेसून घेवून मग त्यामध्ये अंडे फोडून सेसून घ्या. मग त्यामध्ये मैदा घालून मिक्स करून थंड झालेले दुध घालून घट्ट पीठ मळून अर्धातास भिजवलेला गोळा बाजूला ठेवावा,
मग भिजवलेल्या पिठाचे लहान लहान गोळे बनवून त्याच्या पुऱ्या बनवाव्यात. प्रतेक पुरीमध्ये एक खजूर ठेवून पुरीला करंजीचा आकार द्या व कडा नक्षीच्या चाकीने कापा. अश्या प्रकारे सर्व करंज्या बनवून घ्या.
कढईमधे तूप गरम करून त्यामध्ये करंज्या गुलाबी रंगावर तळून घ्या. थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा.