खमंग चकली भाजणी: ह्या आगोदर आपण काही चकलीचे वेगवेगळे प्रकार पाहीतले. काही चकली भाजणीचे सुद्धा प्रकार पाहिले. अजून एक छान खमंग चकलीचा प्रकार आहे. दिवाळी आली की आपण दीपावलीसाठी फराळाच्या रेसिपी पहात असतो. तसेच नवीन- नवीन प्रकार आपल्याला बनवायला सुद्धा आवडतात.
अश्या प्रकारच्या चकलीच्या भाजणीमध्ये तांदूळ, चणाडाळ, उडीदडाळ, मुगडाळ, साबुदाणा व पोहे वापरले आहेत त्यामुळे ही चकली अजूनच खमंग लागते. दिवाळी साठी आपण वेगवेगळे फराळाचे पदार्थ बनवतो. फराळाच्या पदार्थामध्ये प्रथम आपण चकली उचलतो कारण ती सर्वांना आवडते. तांदूळ हा साधाच वापरला तरी चालतो.
ह्या पोस्टमध्ये फक्त चकली भाजणी कशी बनवायची आहे ते सांगितले आहे. ह्या भाजणी पासून नंतर चकली बनवायची आहे.
The English language version of this same recipe can be seen here – Bhajani for Making Crispy Chakli
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: १ किलो २०० ग्राम भाजणी बनते
साहित्य:
४ कप तांदूळ
२ कप चणाडाळ
१ कप उडीदडाळ
१ कप साबुदाणा
१ कप मुगडाळ
१ कप पोहे
१/२ कप धने
१/४ कप जिरे
कृती:
प्रथम तांदूळ, चणाडाळ, उडीदडाळ, मुगडाळ वेगवेगळी धुवून एका कापडावर २-३ तास वेगवेगळी पसरवून ठेवा. मग मंद विस्तवावर तांदूळ व डाळी वेगवेगळ्या भाजून घ्या. नंतर साबुदाणा, पोहे, धने व जिरे भाजून घ्या.
सगळी धान्य भाजून थंड झाल्यावर मिक्स करून गिरणीतून दळून आणा. नंतर आपल्याला पाहिजे तेव्हा पाहिजे तेव्हडे भाजणीचे पीठ घेवून चकली बनवता येते.
पारंपारिक महाराष्ट्रीयन पद्धतीची चकलीची भाजणी रेसिपी येथे पहा – पारंपारिक चकलीची भाजणी
very nice cooking. nice recipe.