पनीर मस्तानी: पनीर मस्तानी ही एक जेवणामध्ये बनवायला छान खमंग डीश आहे. ही डीश बनवतांना पनीर, उकडलेले बटाटे व डाळींबाचे दाणे वापरून ग्रेवी बनवली आहे. घरी पार्टी असेल अथवा सणावाराला सुद्धा बनवायला छान आहे. आपण ह्या आगोदर पनीरच्या बऱ्याच डिशेश पाहिल्या आहेत.
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१०० ग्राम पनीर
३ मध्यम आकाराचे बटाटे
२ टे स्पून कॉर्नफ्लोर
१/२ कप डाळीबाचे दाणे
१ टे स्पून आले-लसूण पेस्ट
३ टे स्पून काजू पेस्ट
१ टे स्पून फ्रेश क्रीम
१/२ टी स्पून वेलचीपूड
मीठ व साखर चवीने
१ टी स्पून कसुरीमेथी पावडर
१ टे स्पून बटर
१ टी स्पून गरम मसाला
(गरम मसाला करीता: ५-६ मिरे, १ जावीत्री फुल, ४ लवंग, ४ हिरवे वेलदोडे, ३ तमलपत्र, १-२ दालचीनी तुकडे हे सर्व थोडेसे भाजून पूड करावी)
१/२ कप दुध
तेल तळण्यासाठी
कृती:
प्रथम बटाटे उकडून, सोलून, किसून घ्यावेत.पनीर किसून घ्यावे, त्यात वेलचीपूड, मीठ, कॉर्न फ्लोर, घालून गोळा करून घ्यावा. मग त्या गोळ्याचे छोटे-छोटे गोळे करून त्यामध्ये डाळीबाचे दाणे भरून गोळा बंद करून गरम तेलामध्ये ब्राऊन रंगावर तळून घ्यावेत.
कढईमधे टेक गरम करून त्यामध्ये आले-लसून पेस्ट, १ काजू पेस्ट परतून घ्या मग त्यामध्ये दुध घालून फ्रेश क्रीम, गरम मसाला, वेलचीपूड, कसुरी मेथी, घालून उकळी आली की बटर घालावे. चवीला मीठ व साखर घालावी.
गरम गरम सर्व्ह करावे. सर्व्ह करतांना कोफ्ते ठेवून त्यावर ग्रेव्ही घालून पराठा बरोबर सर्व्ह करावे.