आलू माखणे भाजी: मखाने आलू भाजी ही. पंजाब, गुजरात ह्या भागामध्ये अश्या प्रकारची भाजी बनवतात. माखणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनी हितावह आहेत. त्यामध्ये अनेक पोषकतेचे गुण आहेत. आलू-माखणे ग्रेव्ही बनवतात मखाने, बटाटे, टोमाटो व मसाला वापरला आहे. माखणे रोज खाणे हितावह आहेत तसेच बनवायला सोपी आहे.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ कप माखणे
८ छोटे बटाटे
१ टोमाटो,
७-८ काजू (बारीक कुटून)
१ टे स्पून तेल
१ टे स्पून फ्रेश क्रीम
मीठ चवीने
मसाला करीता:
२ मोठे कांदे १ टी स्पून तेल
७-८ लसून पाकळ्या
१” आले
२ हिरव्या मिरच्या
१ टी स्पून बडीशेप (कुटून)
१ टी स्पून धने-जिरे पावडर
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून हळद
फोडणी करीता:
१ टी स्पून तेल
१/२ टी स्पून शहाजिरे
१/४ टी स्पून कसुरीमेथी
कृती:
एका कढईमधे १ टे स्पून गरम करून त्यामध्ये मखाने घालून ५ मिनिट मंद वास्तवावर परतून घ्या. कांदे चिरून घ्या, टोमाटो उकडून त्याची प्युरी करून घ्या. बडीशेप कुटून घ्या. बटाटे उकडून सोलून घ्या.
मसाला करीता: एका कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदे, आले-लसून, हिरव्या मिरच्या घालून ५ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये शहाजिरे व कसुरी मेथी घालून वाटलेला कांदा मसाला घालून चांगला परतून घ्या. मग त्यामध्ये टोमाटो प्युरी घालून परत २-३ मिनिट परतून लाल मिरची पावडर, बडीशेप पावडर, हळद, धने-जिरे पावडर व मीठ घालून मिक्स करून १ कप पाणी घालून उकडलेले बटाटे व परतलेले मखाने घालून ५-७ मिनिट मंद विस्तवावर शिजू घ्या.
आलू-मखाने भाजी चपाती बरोबर किंवा पराठा बरोबर सर्व्ह करा.
The Video in Marathi can be seen on our YouTube Channel- https://www.youtube.com/watch?v=MsGlkzWa594&t=2s