डीलीशीयस पेरूचे आईस्क्रीम: पेरू म्हणजेच गवा किंवा अमरूदचे आईस्क्रीम होय. ह्या अगोदर आपण द्राक्षाचे ब्लॅककरंट आईसक्रिम पाहिले ते आपण फ्रेश काळ्या द्राक्षांपासून बनवले होते. तसेच आता आपण फ्रेश ताज्या पेरूचे आईस्क्रीम कसे बनवायचे ते पाहूया. पेरूचे आईस्क्रीम बनवतांना आपण कलमी पेरू किंवा आपले गुलाबी रंगाचे पेरू सुद्धा वापरू शकतो.
The Marathi language video Chamchamit Peruche Ice Cream Tasty Spicy Guava Ice Cream be seen on our YouTube Channel of Chamchamit Peruche Ice Cream Tasty Spicy Guava Ice Cream
पेरूचे आईस्क्रीम बनवण्यासाठी मी सॉफटी आईसक्रिमच्या पद्धतीने बनवले आहे त्यामुळे ते छान मऊ मुलायम होते. गुलाबी रंगाचे पेरू वापरले तर छान गुलाबी रंग येतो. आपण म्हणतो की थंडी मध्ये पेरू कसे खायचे किंवा पेरूचे आईस्क्रीम कसे खायचे कारण पेरू थंड असतो. पण थंडी मध्ये पेरू खाणे किंवा पेरूचे आईस्क्रीम खाणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. पेरूचे आईस्क्रीम सर्व्ह करतांना वरतून लाल मिरची पावडर भुरभुरून मग सर्व्ह करा त्याची टेस्ट अप्रतीम लागते.
बनवण्यासाठी वेळ: १५-२० मिनिट
सेट करण्यासाठी वेळ २ तास
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ कप बेसिक आईस्क्रीम पध्दत येथे पहा- Basic Icecream Recipe
२ मोठे पेरू
४-५ थेब व्ह्नीला ईसेन्स
३ टे स्पून फ्रेश क्रीम
१/४ टी स्पून लाल मिरची पावडर
कृती: प्रथम बेसिक आईस्क्रीम बनवून ठेवा त्यामुळे आपल्याला झटपट कोणतेही आईस्क्रीम बनवता येते. पेरू स्वच्छ धुवून पुसून त्याच्या फोडी करून त्याचा पल्प बनवून घ्या.
मग एका जस्ताच्या भांड्यात पेरूचा पल्प, फ्रेश क्रीम, बेसिक आईस्क्रीम व व्ह्नीला ईसेन्स घेवून ५ मिनिट ब्लेंड करून घ्या. किंवा फ्लफी होईस्तोवर ब्लेंड करून घ्या. मग डीप फ्रीजमध्ये दोन तास सेट करायला ठेवा.
अमृद्चे आईस्क्रीम सेट झाले की सर्व्ह करतांना वरतून लाल मिरची पावडरने सजवून मग सर्व्ह करा.