मुलांसाठी खास झटपट फ्रुट पिझ्झा : ह्या आगोदर आपण वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट पिझ्झा पाहिले. फ्रुट पिझा हा खास मुलासाठी खास डीश आहे. अश्या प्रकारचा फ्रुट पिझ्झा मुलांना नाष्ट्या साठी किंवा इतर वेळी भूक लागली की बनवता येतो. मुले नाहीतरी फळे खायचा कंटाळा करतात फ्रुट पिझ्झा च्या निमीतानी फळे सुद्धा दिली जातील व पिझा खाल्याचा सुद्धा आनंद मिळेल.
फ्रुट पिझ्झा बनवतांना बेस बाजारात जे मिळतात ते वापरले आहे आवरणासाठी जाम, निरनिराळी फळे, चीज व ड्रायफ्रुट वापरले आहे.
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ३ बनतात
साहित्य:
३ पिझ्झा बेस बाजारात एका पाकिटात मिळतात
४ टे स्पून मिक्स फ्रुट जाम
३ टी स्पून लोणी
३ कप फळे कापून (अननस, सफरचंद, द्राक्षे, संत्री, मोसंबी, स्ट्रॉबेरी)
२ टे स्पून मध
१/४ कप काजू बदाम, टूटी फ्रूटी तुकडे करून
१/२ कप चीज किसून
कृती: प्रथम फळे धुवून, पुसून मोठे-मोठे तुकडे करून घ्या व एका बाऊलमध्ये ठेवून त्यावर मध घालून हलक्या हातानी मिक्स करून घ्या. चीज किसून घ्या.
पिझा बेसला एका बाजूनी बटर व दुसऱ्या बाजूनी मिक्स फ्रुट जाम लावून घ्या. जाम लावून झाल्यावर त्यावर फळे छान आकर्षक रीतीने सजवून घ्या मग काजू, बदाम, टूटी फ्रूटी तुकडे घालून किसलेले चीज घाला.
ओव्हन गरम करून घ्या व पिझा पाच मिनिट ठेवावा चीज वितळले की पिझा बाहेर काढून सर्व्ह करा.