मकर संक्रांत पूजा विधी, मुहूर्त व तिळाच्या रेसिपी : मकर संक्रांत हा सण २०१९ ह्या वर्षातील पहिला सण आहे. आज १४ जनवरी ह्या दिवशी भोगी आहे ह्या दिवशी मिक्स भाजी व तिळाची भाकरी बनवली जाते. तसेच ह्या वर्षी मकरसंक्रांत १५ जानेवारी ह्या दिवशी साजरी होणार आहे.
भारतात मकर संक्रांत प्रतेक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरी केला जाते. महाराष्टात मकर संक्रांत, केरला मध्ये पोंगल, पंजाबमध्ये माघी व गुजरात मध्ये उतरायण व उतराखंडमध्ये उतरायणी इ.
मकर संक्रांत ह्या दिवशी सूर्य धनु राशी मधून मकर राशी मध्ये प्रवेश करतो त्यावेळी मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. हिंदू परिवार सूर्य देवा साठी हा सण साजरा करतात.
मकर संक्रांत ह्या दिवशी सुवासिनी आपले घर स्वच्छ करून काळ्या रंगाची जरीची साडी नेसून आपल्या संसारासाठी , घरासाठी व आपल्या सौभाग्यासाठी व आपल्या मुलाबाळांसाठी पूजा करतात. पूजा झाल्यावर तीळ गुळाची पोळी व तिळाच्या वड्या किंवा तिळाचे लाडू बनवून नेवेद्य दाखवतात.
पूजा करण्या साठी मुहूर्त सकाळी ७.१९ पासून चालू होणार आहे व रात्री १२:३० परंत आहे.
पूजाविधी व साहित्य:
एका थाळी मध्ये ५ मातीची मटकी म्हणजेच बोळकी त्यांना धागा बांधून त्यामध्ये पाच प्रकारची धान्ये किंवा भाज्या, तीळ गुळ ठेवून त्यावर एक पणती ठेवून प्रत्येक बोळक्याला हळद कुंकू लावून नवीन कापडाने झाकून ठेवावे मग तुपाचा दिवा व अगरबत्ती लावून पूजा करून प्रार्थना करावी की माझ्या संसाराला कोणाची नजर लागू नये. मग तिळाची पोळी, तिळाच्या वड्या चा भोग दखवावा. संध्याकाळी ५ / ७ किंवा ११ सुवासीनीना हळद-कुंकू देवून वाण द्यावे.
मकर संक्रांतसाठी काही खास तिळाच्या रेसिपी खाली देत आहे.
Tilgulache Ladu Recipe in Marathi
Maharashtrian Tilgul Sesame Seeds Ladoo
Tilachi Vadi for Makar Sankranti festival
Delicious Til Gulachi Karanji Recipe in Marathi
Tilachi Burfi Recipe in Marathi
Chocolate Tilache Ladoo Recipe in Marathi
Til Gulachi Poli Recipe in Marathi
मकर संक्रांतीचे महत्व , माहिती व पूजा कशी करावी हे खलील लेखात आपण बघु शकता.
मकर संक्रांतीचे महत्व पूजा व माहिती