रिफ्रेशिंग ब्लॅककरंट आईसक्रिम: ब्लॅककरंट हे शब्द जरी आईकला तरी एकदम काहीतरी वेगळेच वाटते. ब्लॅककरंट आईसक्रिम बनवण्यासाठी काळी फ्रेश द्राक्षे वापरली आहेत. त्यामुळे आईस्क्रीम ला फार सुंदर रंग येतो व ते खूप टेस्टी लागते. मी हे आईस्क्रीम बनवताना सॉफटी आईसक्रिमच्या पद्धतीने बनवले आहे त्यामुळे ते छान मऊ मुलायम होते. ब्लॅककरंट आईसक्रिम बनवायला फार सोपे आहे. आपण जर आधी बेस बनवून ठेवला तर आपले कोणते सुद्धा आईसक्रिम झटपट बनते.
जेवण झाल्यावर किंवा घरी पार्टीसाठी डेझर्ट म्हणून सुद्धा बनवायला छान आहे.
बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट
सेट करण्यासाठी वेळ २ तास
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ कप बेसिक आईस्क्रीम पध्दत येथे पहा Recipe for Basic Icecream
१ कप काळी ताजी द्राक्षे
३ टे स्पून फ्रेश क्रीम
कृती: प्रथम बेसिक आईस्क्रीम बनवून घ्या. मग त्याचे १ कप तुकडे करून घ्या.
काळी द्राक्षे स्वच्छ धुवून पुसून घ्या. मग मिक्सरमध्ये त्याचा पल्प काढून घ्या. एका जाड बुडाच्या भांड्यात पल्प घेवून त्यामध्ये १ टे स्पून साखर घालून २-३ मिनिट मंद विस्तवावर गरम करून घ्या म्हणजे त्यामधील पाण्याचा अंश कमी होईल,मग विस्तव बंद करून पल्प थंड करायला ठेवा.
एका जस्ताच्या भांड्यात बेसिक आईसक्रिमचे तुकडे, फ्रेश क्रीम व द्राक्षाचा पल्प घेवून ब्लेंडरने ५ मिनिट ब्लेंड करून घ्या. मिश्रण छान हलके होईल मग भांडे डीप फ्रीजमध्ये २ तास सेट करायला ठेवा.
ब्लॅककरंट आईसक्रिम सर्व्ह करतांना वरतून काळी द्राक्षे घालून सजवून द्या.