उपवासाची मखाने खीर: मखाने मध्ये प्रोटीन व कार्बोहाइड्रेट भरपूर आहेत. मखाने उपवासासाठी सुद्धा चालतात. त्यापासून काही पक्वान्न सुद्धा बनवता येतात. मखानेची खीर खूप स्वादिस्ट लागते. ह्यामध्ये ड्रायफ्रुट घालून अजून स्वादीस्ट बनवता येते.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ लिटर दुध (म्हशीचे)
१ १/२ कप मखाने
१ टी स्पून साजूक तूप
१५ बदाम
१ टी स्पून वेलचीपूड
१/४ कप साखर
२ टे स्पून बेदाणे
कृती: दुध गरम करून बाजूला ठेवा. मखान्याचे मोठे तुकडे करून घ्या. मग मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. बदाम थोडे जाडसर कुटून घ्या.
एका जाड बुडाच्या कढईमधे तूप थोडे गरम करून जाडसर वाटलेले मखाने थोडेसे परतून घ्या. मखाने परतून झाल्यावर त्यामध्ये दुध घालून मिक्स करून दुध ३/४ होईपरंत आटवून घ्या. म्हणजे मखाने पण चांगले शिजतील.
मग त्यामध्ये बदामाची पूड घालून चांगली उकळी आली की त्यामध्ये साखर घालून २-३ मिनिट दुध मंद विस्तवावर ठेवा.
भांडे विस्तवावरून उतरवून त्यामध्ये वेलचीपूड व बेदाणे घालून मिक्स करून बाजूला ठेवा. थंड झाल्यावर फ्रीजमध्ये थंड करून मग थंड थंड मखाने खीर सर्व्ह करा.
The recipe in the English language of the same Kheer Recipe can be seen here – Makhana Kheer for Fasting and Festivals