उपवासाची इडली: उपवासाची इडली ही एक छान वेगळी चवीस्ट डीश आहे. आपण उपवासाच्या दिवशी नेहमी साबुदाणा खिचडी बनवतो. त्याआयवजी इडली बनवून बघा सगळ्यांना खूप आवडेल. उपवासाची इडली चटणी बरोबर सर्व्ह करा.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी : ४ जणासाठी
साहित्य:
५ कप वरईचे तांदूळ
७-८ हिरव्या ताज्या मिरच्या
१ टी स्पून आले वाटून
१/२ टी स्पून जिरे
मीठ चवीने
१/४ कप तूप
१/४ टी स्पून खाण्याचा सोडा
१/२ कप शेंगदाणा कुट
कृती: प्रथम वरई धुवून ती बुडेल एव्ह्डे पाणी घालून ४ तास बाजूला झाकून ठेवा. शेंगदाणे भाजून, सोलून कुट बनवा.
मग मिक्सरच्या भाड्यात भिजवलेली वरई, हिरव्या मिरच्या, जिरे, बारीक वाटून एका भांड्यात काढून त्यामध्ये वाटलेले आले, मीठ, शेंगदाणा कुट घालून मिक्स करून घ्या.
इडलीच्या पात्राला तुपाचा हाल लावून घ्या. वाटलेल्या इडलीच्या पिठात सोडा घालून मिक्स करून इडली पात्रात
डावाने पीठ घालून इडल्या वाफवून घ्या.
गरम गरम इडली सर्व्ह करा. इडली बरोबे सर्व्ह करताना दह्यात, मीठ, जिरेपूड घालून मिक्स करून द्या.