चटपटे मखाने: आपण ह्या अगोदर पाहिले आहे की मखाने किती पौस्टिक आहेत. लहान मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान आहेत. त्यामुळे पोट सुद्धा भरते व मुले आवडीने खातात. किंवा इतर वेळी सुद्धा भूक लागली की झटपट बनवता येतात.
मखाने हे चवीस्ट आहेत व त्याच्या सेवनाने ताकद येते व त्याचे गुण आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेमंद सुद्धा आहेत. मखानेच्या सेवनाने बऱ्याच रोग समस्या दूर होतात व बदाम व अक्रोड पेक्षा ते उत्तम आहेत.
This English language version of this Makhana Snack recipe can be seen here – Crispy Roasted Makhana Seeds
बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
३ कप मखाने
१/४ टी स्पून हळद
१/२ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून चाट मसाला
मीठ चवीने
३ टे स्पून तेल
कृती:
जाड बुडाच्या कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये मखाने घालून ७-८ मिनिट मंद विस्तवावर कुरकुरीत होईस्तोवर परतून घ्या. मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, मीठ घालून मिक्स करून घेऊन फक्त १ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. नाहीतर लाल मिरची पावडर करपून जाईल.
चटपटे मखाने सर्व्ह करताना वरतून चाट मसाला भुरभुरून मग सर्व्ह करा.
The Marathi video of this Makhana Snacks recipe can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=p-POGXQAXO0