कडवे/ गोडे वालाची आमटी/ बिरड्याची आमटी: वालाची आमटी ही छान खमंग व चवीस्ट लागते. ह्या आगोदर आपण वालाची खिचडी व वालाची उसळ पाहिली. ह्या दोन्ही रेसिपी फार रुचकर लागतात. वालाची आमटी ही कोकण भागातील फार लोकप्रिय आमटी आहे. अश्या प्रकारची आमटी बनवतांना ओल्या नारळाचा मसाला व आमसूल वापरला आहे.
वालाची आमटी बनवण्यासाठी आगोदर वाल ७-८ तास भिजत घालून मग पाणी काढून त्याला चांगले मोड आले की ते सोलून त्याची आमटी बनवतात.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ कप सोललेले वाल
१ छोटा बटाटा ७-८ काजू
२ आमसूल १ टी स्पून गरम मसाला
२ टे स्पून कोथंबीर (चिरून)
मीठ चवीने
ओला मसाला करीता:
१ टी स्पून तेल
१ छोटा कांदा (उभा चिरून)
७-८ लसून पाकळ्या,
१” आले तुकडा
१ कप ओला नारळ (खोवलेला)
१ १/२ टी स्पून लाल मिरची पावडर
फोडणी करीता:
१ टे स्पून तेल/तूप
१ छोटा कांदा (चिरून)
१/४ टी स्पून हिंग
१/४ टी स्पून हळद
कृती:
वाल भिजवून, मोड आणून सोलून घ्या. मग थोडे पाणी वापरून अर्धवट उकडून घ्या. कांदा व कोथंबीर चिरून घ्या. बटाटा सोलून त्याच्या फोडी करून घ्या.
ओल्या मसाला करीता: प्रथम कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये कांदा व लसून गुलाबी रंगावर परतून त्यामध्ये आले व ओला नारळ घालून गुलाबी रंगावर भाजून घ्या. मग त्यामध्ये लाल मिरची पावडर घालून मिक्स करून थोडे परतून घ्या. मसाला थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्या.
कढईमधे तेल अथवा तूप गरम करून त्यामध्ये हिंग व बारीक चिरलेला कांदा व बटाटे फोडी घालून परतून हळद घालून अर्धवट शिजवलेले वाल घालून, वाटलेला ओल्या नारळाचा मसाला, काजू तुकडे घालून, गरम मसाला, मीठ व तों कप पाणी घालून ५-७ मिनिट मंद विस्तवावर मसाला शिजवून घ्या. मग त्यामध्ये कोथंबीर व आमसूल घालून विस्तव बंद करून घ्या.
गरम गरम खमंग वालाची आमटी भाता बरोबर सर्व्ह करा.
The Marathi language video of this Kadva Vaal/ Butter Beans Amti/ Gravy can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=NttUsY76GhA