पंजाबी खमंग बटाट्याची भाजी: पंजाबी बटाट्याची भाजी ही बटाटे उकडून बनवली आहे. ही भाजी पराठ्याबरोबर टेस्टी लागते. ही भाजी बनवताना बटाटे उकडून घेतले व आले-लसून, कांदा, लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर व टोमाटो वापरला आहे. अश्या प्रकारची भाजी झटपट बनते जर कोणी पाहुणे येणार असतील तर अशी खमंग भाजी बनवा. ह्या भाजीसाठी तेल थोडे जास्तच लागते म्हणजेमग ती टेस्टी लागते.
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जनासाठी
साहित्य:
३ मोठ्या आकाराचे बटाटे
२ मध्यम आकाराचे कांदे
१ छोट्या आकाराचा टोमाटो
१ टे स्पून आले-लसून पेस्ट
२ टी स्पून लाल मिरची पावडर
१/२ टी स्पून हळद
१ टी स्पून ध्ये-जिरे पावडर
मीठ चवीने
१/४ कप कोथंबीर चिरून
फोडणी करीता:
२ टे स्पून तेल
१/४ टी स्पून हिंग
कृती: बटाटे उकडून, सोलून, त्याच्या फोडी करून घ्या. कांदा, टोमाटो व कोथंबीर चिरून घ्या. आले-लसून पेस्ट बनवून घ्या.
कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये हिंग घालून मग कांदा घाला. कांदा गुलाबी रंगावर परतून झाल्यावर आले-लसून व टोमाटो २ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या.
कांदा-आले-लसून परतून झाल्यावर लाल मिरची पावडर, हळद, धने-जिरे पावडर व मीठ घालून मिक्स करून बटाट्याच्या फोडी घालून मिक्स करून घ्या. कढईवर झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्या. सर्व्ह करतांना कोथंबीर घालून चपाती बरोबर किंवा पराठ्याबरोबर सर्व्ह करा.