मेथांबा: मेथांबा हा कच्या कैरी पासून बनवतात. जवळपास हा लोणच्याचाच प्रकार आहे. फक्त थोडी पध्दत वेगळी आहे. मेथांबा हा चपाती बरोबर किंवा पराठ्याबरोबर सुद्धा छान लागतो. हा महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवला आहे. एप्रिल, मे महिना आला की बाजारात हिरव्या कच्या कैऱ्या येतात मग आपण कैरीचे वेगवेगळे पदार्थ बनवतो. त्यामधील हा एक प्रकार म्हणजे मेथांबा होय.
मेथांबा हा आंबटगोड गोड तिखट छान लागतो. व त्याला फोडणी दिल्याने खमंग सुद्धा लागतो.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी : ४-६ जणासाठी
साहित्य:
२ मध्यम आकाराच्या कैऱ्या
१ टी स्पून मेथी दाणे
१ वाटी गुळ
२ टे स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
फोडणी करीता:
२ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१/२ टी स्पून हिंग
१/४ टी स्पून हळद
कृती: कैऱ्या धुवून, पुसून ताच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्या. एका कढईमधे फोडणी करीता तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, हळद, मेथ्या घाला. मेथ्या गुलाबी झाल्यावर कैरीच्या फोडी घालून मिक्स करून कढईवर झाकण ठेवून त्यावर पाणी घालावे.
झाकणावर पाणी घातल्यामुळे कैरी मऊ शिजेल. मग त्यामध्ये १ वाटी पाणी घालून गुळ व मीठ चवीने घालून थोडे घट्ट होई परंत शिजवून घ्या.