पनीर मखनी: पनीर मखनी ही एक मेन जेवणातील डीश आहे. ही डीश आपण नेहमीच्या जेवणात किंवा कोणी पाहुणे येणार असतील किंवा सणावाराला बनवू शकतो. ही एक रीच भाजीची डीश आहे. पनीर मखनी बनवतांना प्रथम छान खमंग मसाला बनवून घेतला आहे. ही भाजी बनवतांना बटर, फ्रेश क्रीम, काजू, पनीर, टोमाटो वापरले आहेत. पनीर मखनी ही एक नॉर्थ इंडीयन डीश आहे.
आता परंत आपण पनीरच्या बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या बघितल्या आहेत. पनीर मखनी ही भाजी अगदी रेस्टॉरंट सारखी बनते.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य: पनीर मखनी मसाला करीता:
१ टे स्पून तेल
२ मोठे कांदे चिरून
१०-१२ लसून पाकळ्या सोलून
१” आले तुकडा
१/४ कप काजू
१ टी स्पून खसखस
२ टे स्पून सुके खोबरे (किसून)
साहित्य पनीर मखनी बनवण्यासाठी
२५० ग्राम पनीर
१ टी स्पून तेल
१ टे स्पून बटर
१ टी स्पून कसुरी मेथी
१/४ कप टोमाटो प्युरी
१ टे स्पून फ्रेश क्रीम
१ १/२ टी स्पून लाल कश्मीरी पावडर
१ टी स्पून गरम मसाला
मीठ चवीने
कोथंबीर सजावटीसाठी
कृती: मसाला करीता: कढईमधे तेल गरम करून चिरलेला कांदा घालून बदामी रंगावर परतून घ्या. मग त्यामध्ये आले-लसून घालून परतून काजू, खसखस, सुके खोबरे घालून मिक्स करून थोडे परतून घेवून विस्तव बंद करून मिक्सरमध्ये बारीक वायून घ्या.
कढईमधे तेल गरम करून बटर घाला. बटर गरम झाल्यावर कसुरी मेथी घालून त्यामध्ये वाटलेला मसाला मिक्स करून तेल सुटे परंत परतून घ्या. मसाला परतून झाल्यावर टोमाटो प्युरी घालून २-३ मिनिट परतून त्यामध्ये काश्मिरी लाल मिरची पावडर, गरम मसाला, फ्रेश क्रीम, मीठ चवीने घालून मिक्स करून १/२ कप पाणी घाला व चांगली उकळी आल्यावर जर ग्रेव्ही जास्त घट्ट वाटली तर अजून थोडे पाणी घालून चांगली गरम होऊ द्या मग त्यामध्ये पनीरचे पिसेस घालून मिक्स करून वाफ आल्यावर कोथंबीरीने सजवून घ्या.
गरम गरम पनीर मखनी जीरा राईस बरोबर किंवा पराठा बरोबर सर्व्ह करा.
The Marathi language video of this Paneer Makhani recipe and preparation method can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=zM6gPWMEZZU